Jalgaon District Collector : ई-सेवांद्वारे नागरिकांना सुविधा देण्यास कटिबद्ध : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Collector Ayush Prasad speaking at the program held on Tuesday on the occasion of Revenue Day.
Collector Ayush Prasad speaking at the program held on Tuesday on the occasion of Revenue Day. esakal
Updated on

Jalgaon District Collector : ई- सेवांच्या माध्यमातून नागरिकांना अधिकाधिक नागरी सुविधांचा लाभ देण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी (ता. १) येथे दिली. (Collector Ayush Prasad statement about Committed to provide convenience to citizens through e services jalgaon news)

जिल्ह्यातील महसूल दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. महसूल दिनाचे औचित्य साधून सुरू झालेल्या सप्ताहास विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात सुरवात झाली. त्यास सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सप्ताहाची सुरवात जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या हस्ते झाली‌. जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, एम. पी. मिगर आदी उपस्थित होते.

श्री. प्रसाद म्हणाले, की नागरिकांना महसूलविषयक सुविधा देताना कमीत कमी मानवी हस्तक्षेपाविना ई-सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. महसूल सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांना अनेक सुविधांचा सहज-सुलभ लाभ मिळणार आहे.

पोलिस अधीक्षक राजकुमार म्हणाले, की पोलिस प्रशासन एकमेकांच्या समन्वयातून जिल्ह्याला चांगल्या सेवा प्रदान करण्याचे काम करणार आहोत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Collector Ayush Prasad speaking at the program held on Tuesday on the occasion of Revenue Day.
Jalgaon Municipal Commissioner : कोट्यवधींची विकासकामे, मग खोडा कसा? : आयुक्त डॉ. विद्या गायकवाड

जिल्ह्यातही महसूल सप्ताह

जिल्ह्यात एरंडोल येथे गाव स्तरावर ई-पीक पाहणी, कार्यालयीन स्तरावर साफसफाई स्वच्छता मोहीम राबविण्यात आली‌. जामनेर, रावेर, यावल, बोदवड, भडगाव, चाळीसगाव येथे उत्कृष्ट अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

चोपडा येथे मतदार जनजागृती रॅली व मतदार जागृती कार्यक्रम झाला. पारोळा येथे रक्तदान शिबिर व डिजिटल गाव नकाशा वितरण करण्यात आले. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत १३ पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला‌.

या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

उत्कृष्ट काम करणारे अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार जितेंद्र कुंवर, नायब तहसीलदार संभाजी पाटील, देवेंद्र चंदनकर, एस. यु. तायडे व अव्वल कारकून संदीप जयस्वाल, वैशाली पाटील, अरुण वसावे, अलका पाटील, मंडलाधिकारी दीपक गवई, एम. एम. फड, अजिंक्य आंधळे, मधुकर पाटील, महसूल सहाय्यक मोनीष बेंडाळे, अमोल चौधरी, रेखा राठोड, तलाठी आबाजी सोनवणे, एन. बी. सोनवणे, बालाजी लोंढे, चेतन ठाकूर वाहनचालक दिलीप पाटील, शिपाई भागवत कोळी, मुक्ता खोंड, कोतवाल जितेंद्र धनगर, सुकदेव कोठारे यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून सन्मान करण्यात आला‌.

Collector Ayush Prasad speaking at the program held on Tuesday on the occasion of Revenue Day.
Jalgaon NMU News : बी.एस्सी. कॉम्प्युटरसह बीसीए प्रवेशसंख्या वाढ; ‘उमवि’च्या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.