Jalgaon District Collector : अधिकाऱ्यांच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्यांवर ‘एमपीडीए’ लावणार : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Jalgaon District Collector Ayush Prasad
Jalgaon District Collector Ayush Prasad esakal
Updated on

Jalgaon District Collector : जिल्ह्यातील सर्वांना सारखी वागणूक दिली जाईल. विकासात्मक कामांवर भर देऊ. बेरोजगारांची संख्या अधिक आहे, त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन, स्कील ट्रेनिंग देऊ.

माझा कारभार पारदर्शी व गतिमान असेल. वाळूमाफियांविरोधात कठोर कारवाई करू. महसूल अधिकाऱ्यांच्या वाहनांचा पाठलगा करणाऱ्यांवर ‘एमपीडीए’ लावण्याचा इशारा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी (ता. २४) पत्रकार परिषदेत दिला. (Collector Ayush Prasad statement about imposing MPDA on those chasing officers cars jalgaon news)

श्री. प्रसाद म्हणाले, की वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वाळूमाफियांचा बारीक अभ्यास करून अवैध वाळू उपशावर नियंत्रणासाठी एक समिती नेमणार आहे. जेसीबी, ट्रॅक्टर, बोटीद्वारे वाळू काढणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

माहिती-तंत्रज्ञानाच्या सोबतीला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून ई-गव्हर्नसद्वारे कारभार करण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर राहणार आहे. जिल्हा प्रशासनाचे कामकाज पारदर्शक व गतिमान पद्धतीने चालविण्यात येईल. भूसंपादनाअभावी रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यात येतील.

‘एक गाव- एक गणपती’ उपक्रम

सण-उत्सवाच्या काळात जिल्ह्यात शांतता व सौहार्दपूर्ण वातावरण ठेवण्यावर प्रशासनाचा भर राहील. ‘एक गाव-एक गणपती’ची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon District Collector Ayush Prasad
Jalgaon News : रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा करणार; महापौर, उपहापौरांचे आदेश

जिल्ह्यात मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नवमतदारांनी मतदार म्हणून नोंदणी करावी‌, असे आवाहनही श्री. प्रसाद यांनी या वेळी केले.

दरम्यान, जिल्हधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री. प्रसाद यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील पावसाची सध्यस्थिती, अतिवृष्टी आदी बाबींचा आढावा घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी श्री. प्रसाद यांचे स्वागत केले.

जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित पन्नू, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, विविध विभागप्रमुख या वेळी उपस्थित होते.

Jalgaon District Collector Ayush Prasad
Jalgaon Police Transfer : गुन्हे आढावा बैठकीत गाजला बदल्यांचा मुद्दा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीचे एसपींचे आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.