जळगाव : ‘एच.आय.व्ही’ सह (एड्स) जीवन जगणाऱ्या लोकांना व अतिजोखीम गटातील लोकांना रेशन कार्ड, धान्य पुरवठा व इतर शासकीय योजना देण्याबाबत प्राधान्याने करा.
एचआयव्ही बाधित व देह विक्री करणाऱ्या महिलांना देण्यात येणाऱ्या सामाजिक लाभाच्या योजनांचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्यात यावेत. जिल्ह्यात एचआयव्ही एड्स नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.
यासाठी एचआयव्हीबाबत जाणीव-जागृतीची मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी (ता.९) येथे दिल्या. (Collector Ayush Prasad statement Immediately give ration cards to those living with HIV Jalgaon News)
जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाची आढावा सभा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भोयेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे, जिल्हा एड्स नियंत्रण विभागातील कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर, गिरीश गडे, डॉ. आकाश चौधरी, पोलिस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी, जिल्हा एड्स नियंत्रण विभागांतर्गत वेगवेगळ्या विविध गटांमध्ये कार्यरत सामाजिक संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, जिल्ह्यातील जास्तीत जास्त खासगी प्रयोगशाळा/रुग्णालये यांनी जिल्हा एड्स नियंत्रण विभागास एच. आय. व्ही संसर्गाचा अहवाल दर महिन्याला सादर करावा.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी पहूरकर म्हणाले, एचआयव्ही एड्स बाबत माहिती, शंका तसेच तपासणी बाबत माहिती जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य व्यक्ती टोल फ्री '१०९७ 'क्रमांकावर संपर्क साधू शकता.
१६ गरोदर महिला बाधित
जिल्ह्यात एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२३ पर्यंत १ लाख ६४ हजार ७९० इतक्या सामान्य नागरिकांनी एच.आय. व्ही तपासणीमध्ये २३८ रुग्ण एच.आय.व्ही संसर्गित आणि एक लाख १४ हजार ४०२ इतक्या गरोदर मातांची एच.आय.व्ही तपासणी मध्ये १६ गरोदर महिला एच.आय.व्ही संसर्गित आढळून आलेल्या आहेत.
एच.आय.व्ही सह जीवन जगणारे लोकांचे व अति जोखीम गटातील व्यक्तींचे शासकीय योजनांचे लाभाबाबत ६६ प्रकरण पूर्ण झाली आहेत. अशी माहिती पहूरकर यांनी बैठकीत दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.