Jalgaon News : जिल्ह्यातील नगरपालिकांच्या कामात गतिमानता व पारदर्शकता आली पाहिजे. नगरपालिकास्तरावर सुरू असलेली विविध विकासकामे मुदतीत व गुणवत्तापूर्ण करण्यावर भर द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुषप्रसाद यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नगरपालिकांच्या क्षेत्रात सुरु असलेल्या व अन्य पायाभूत सुविधांचा गुरुवारी (ता.२१) झालेल्या बैठकीत आढावा घेतला.(Collector Ayush Prasad statement of Make quality work at municipal level jalgaon news)
या कामांबाबत सूचना
पारोळ्यात राष्ट्रीय महामार्गाचे थांबलेले काम, तसेच अन्य आठ रस्त्यांची कामे पाठपुरावा करून सुरू करण्यात यावीत. धरणगावमध्ये पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून शास्त्री मार्केटचा विषय मार्गी लावावा. शेंदूर्णीमधील विकासकामांचा ग्रामविकास मंत्र्यांशी चर्चा करून प्रस्ताव पाठविण्यात यावा.
नगरपालिका शाखेने नशीराबादमधील २१ कामांच्या प्रशासकीय मान्यता तत्काळ द्याव्यात. यावल व चाळीसगाव मधील घनकचरा प्रकल्पाचे काम १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात यावे. भुसावळ व चाळीसगाव नगरपालिकेतील अनुकंपा भरती ३१ डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावी.
बोदवड नगरपालिकेने एसटीपी प्रकल्प या महिना अखेर मार्गी लावावा. माझी वसुंधरा अभियानात जिंकण्याच्या ईर्षेने सहभागी व्हावा. पाचोरा शेतकी संघ नियमानुसार सोडविण्यात यावा. नगरपालिकांनी लिलावाबाबतचे सर्व प्रस्ताव ५ जानेवारीच्या आत पाठवावेत.
नगरपालिका कर वसुलीसाठी प्रभागनिहाय थकबाकीदारांची यादी तयार करण्यात यावी. वार्डनिहाय वसुली मोहीम शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. टुडे बारकोडला प्रसिद्धी देणे, घंडागाडीच्या माध्यमातून प्रसिद्ध देण्यात यावी.
कर वसुलीसाठी तृतीयपथीयांची मदत
वसुलीसाठी तृतीयपंथीयांची ही मदत घेण्यात यावी. २८ फेब्रुवारीपर्यंत घरपट्टी व पाणीपट्टी वसुली थकीत राहणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाच्या मूल्यमापनासाठी केआरए पद्धत सुरू करण्यात यावी.
१५ जानेवारी २०२४ पर्यंत बचतगटांची स्थापना पूर्ण करण्यात यावी. बचतगटांना पैसे देताना त्यांची सर्व पात्रतासह यादी ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करावी. बँकाबरोबर समन्वय साधून नगरपालिकांनी १० जानेवारीपर्यंत निधीचे वितरण करणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री/मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्वनिधी, प्रधानमंत्री समृद्धी व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातील कर्ज प्रकरणातील प्रस्ताव १५ जानेवारीपर्यंत मंजूर करण्यात यावीत. प्रधानमंत्री आवास योजनेत कामे सुरू असलेल्या ठिकाणांना ३१ डिसेंबरपर्यंत भेट द्यावी.
२८ फेब्रुवारीपर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेचे काम पूर्ण करण्यात यावे. कर्मचारी संघटनांबरोबर बैठक घेऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात यावेत. माझी वसुंधरा सारखा स्वच्छ सर्वेक्षणासाठी एक आराखडा तयार करण्यात यावा.
कामांवर साइट व्हिजिट
न्यायालयात वेळेत शपथपत्र दाखल करण्यात यावे. कामांवरील स्थगिती उठविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत. जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून नगरपालिकेत सुरू असलेल्या कामांची साइट व्हिजिट करण्यात यावी.
या साइट व्हिजिटमध्ये कामांची गुणवत्ता तपासण्यात यावी. २६ जानेवारीपर्यंत कामे पूर्ण करण्यात यावेत. काम पूर्ण झाल्यावर निधी मागणी करण्यात यावी. अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.