Jalgaon News : रेल्वे पुलाखालील अवैध वाळू उपशाची चौकशी सुरू; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Sakal-Impact
Sakal-ImpactSakal
Updated on

सकाळ Impact

Jalgaon News : वाळू माफियांनी सुरत रेल्वे मार्गावर असलेल्या गिरणा नदीवरील रेल्वे पुलाखालील अवैध वाळू उपसा सुरू केल्याच्या प्रकरणाची दखल जिल्हाधिकारी आयूष प्रसाद यांनी घेतली आहे.

रेल्वे पुलाखालील वाळू उपशाची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे विभागाला दिले आहे.(Collector order to investigate illegal sand mining under railway bridge jalgaon news)

जर वाळू उपसा करणारे आढळून आल्यास थेट पाच वर्ष कैदेची शिक्षा रेल्वे नियमानुसार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिली.

‘सकाळ’ने शुक्रवारच्या अंकात वाळू माफियांची मुजोरी कायम, आता रेल्वे पुलाखालील वाळू उपसा सुरू’ अशा आशयाचे वृत्त दिले होते. त्यावर जिल्हाधिकारी प्रसाद यांनी भुसावळ रेल्वे विभागाला चौकशी करून संबंधितावर कारवाईचे आदेश दिले. सोबतच अवैध वाळू उपशामुळे रेल्वे पुलाला धोका आहे का? यासंदर्भातत तपासणीचे आदेश दिले आहेत.

Sakal-Impact
Jalgaon News : ‘इस्त्रो’च्या सफरीत रमले भावी शास्त्रज्ञ; महाराष्ट्रातील 61 विद्यार्थ्यांची भेट

भुसावळ रेल्वे विभागाने पश्‍चिम रेल्वेच्या अभियंता आणि ‘जीआरपी’ पोलिसांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन चौकशी सुरू केली आहे. रेल्वेच्या हद्दीतील पुलाच्या खालील शंभर मिटर परिसरातील वाळू न काढण्याचा रेल्वेचा नियम आहे.

जर वाळू काढताना कोणी संशयित आढळतो आहे का? किंवा संशयित कोण आहे त्याचा रेल्वेची पोलिस यंत्रणा शोध घेत आहे. अवैध वाळू उपसा होवू नये यासाठी या पुलाकडे मोठे वाहन येणार नाही, त्यादृष्टीने महसूल प्रशासनाने रस्ते खोदून ठेवले आहे. सोबतच रस्त्याच्या मध्ये पिलर गाडले आहेत.

Sakal-Impact
Jalgaon News : घरबसल्या काढा ‘डिजिटल शिधापत्रिक्रा’; कार्डासाठी ‘नो एजंट’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.