Jalgaon News : ‘ते’ अतिक्रमण 45 दिवसांच्या आत काढा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 Jalgaon Zilla Parishad
Jalgaon Zilla Parishad esakal
Updated on

Jalgaon News : शहरातील नगरपालिकेच्या लालबाग शॉपिंग सेंटरचे बेकायदेशीर अतिक्रमण ४५ दिवसांच्या आत निष्काषित करून त्याचा काढण्याचा संपूर्ण खर्च तत्कालीन नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांच्यासह ३८ नगरसेवकांकडून १८ टक्के व्याजासह वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिले आहेत. (Collector order to remove illegal encroachment of Lalbagh shopping center within 45 days jalgaon news)

अनंत निकम यांनी केलेल्या तक्रारींवर हा निकाल दिला आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू असलेल्या संपूर्ण प्रोसेडिंगला उच्च न्यायालयाने ४ फेब्रुवारी २०२२ ला अंतरिम स्थगिती दिली असल्याचा दावा माजी नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांनी केला आहे. त्यामुळे निकालाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या कार्यकाळात ११ सप्टेंबर २०२० ला ठराव करून पालिकेच्या मालकीच्या लालबाग शॉपिंग सेंटरमधील व्यापाऱ्यांना आठ बाय बारा फूट बांधकाम करून अतिक्रमणास परवानगी दिली होती. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती आणि वाहनाच्या पार्किंगला जागा नव्हती.

त्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. सुनावणी दरम्यान जिल्हाधिकारी मित्तल यांनी पुढीलप्रमाणे निष्कर्ष काढले आहेत. मुख्याधिकाऱ्यांच्या नगरपरिषद अधिनियम १९६५ चे कलम ९२ (३) प्रमाणे कोणती कारवाई केली, याबाबत कोणतेही दस्तऐवज नगरपरिषदेकडे उपलब्ध नाही, टीपी नंबर १२४ मधील गाळेधारकांनी आठ बाय बाराचे पक्के बांधकाम विनापरवानगीने केले आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

 Jalgaon Zilla Parishad
Agriculture News : पावसाचा ‘पॅटर्न’ बदलला, तरी पीक पॅटर्न बदलेना; नगदी पीक म्हणून कापूस, केळीकडेच ओढा..

जाहीर लिलाव पद्धतीचा अवलंब केलेला नाही, सहाय्यक संचालक नगररचना यांच्या शिफारशीला जावक क्रमांक नाही, तारीख नाही. अर्जदार निकम यांनी या गैरप्रकारास तत्कालीन नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, नगरसेवक नरेंद्र चौधरी, शीतल यादव, नूतन पाटील, संतोष पाटील, राधाबाई पवार, सुरेश पाटील, नरेंद्र संदानशिव, निशांतबानो कुरेशी, माया लोहरे, शेख सलीम शेख चिरागोद्दीन, सविता संदानशिव,

मनोज पाटील, घनश्याम पाटील, ॲड. चेतना पाटील, विवेक पाटील, कल्पना चौधरी, निशांत अग्रवाल, संजय भिल, संगीता पाटील, आशा बागूल, संजय मराठे, ज्योती महाजन, प्रवीण पाठक, चंद्रकला साळुंखे, रामकृष्ण पाटील, राजेश पाटील, कमलबाई पाटील, प्रताप शिंपी, किरणबाई जाधव, रत्नमाला महाजन, देविदास महाजन, रत्ना महाजन, विनोद लांबोळे, महावीर पहाडे, सलीम शेख फत्तू, अभिषेक पाटील,

फिरोजखान उस्मानखान पठाण यांना अपात्र ठरविण्यात यावे आणि तत्कालीन मुख्याधिकारी विद्या गायकवाड व जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. मात्र नगराध्यक्षा व नगरसेवक यांची मुदत २०२१ मध्ये संपल्याने जिल्हाधिकारी मित्तल यांनी लालबाग शॉपिंग कॉम्पलेक्स टी. पी. नंबर १२४ मधील बेकायदेशीर वाढीव अतिक्रमण निष्काषित करून त्याचा काढण्याचा खर्च माजी नगराध्यक्षांसह ३८ नगरसेवकांकडून १८ टक्के व्याजासह ४५ दिवसांत वसूल करण्यात यावा, असे आदेश दिले आहेत व वसुलीची कार्यवाही न केल्यास संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

 Jalgaon Zilla Parishad
Jalgaon Kotecha Case : संस्थाध्यक्षा कोटेचा यांची याचिका खंडपीठाने फेटाळली

"तत्कालीन मुख्याधिकारी, बांधकाम अभियंता, नगररचनाकार यांच्यावर कारवाई व्हायला हवी होती व संबंधित नगरसेवकांना सहा वर्षांसाठी अपात्र करायला पाहिजे होते." - अनंत निकम, तक्रारदार

"जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करून अतिक्रमण काढण्यात येईल व नगरसेवकांकडून रक्कम वसूल करण्यात येईल." - प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी, नगरपरिषद, अमळनेर

"लालबाग शॉपिंगबाबत उच्च न्यायालयाने याचिकेचा अंतिम निकाल लागेपर्यंत अंतरिम स्थगिती दिली असून, पुढील सुनावणी १३ जून २०२३ ला होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाचा अवमान केला असून, अवमान याचिका दाखल करणार आहोत." - पुष्पलता पाटील, माजी नगराध्यक्ष, अमळनेर

 Jalgaon Zilla Parishad
Jalgaon News : शिवाजीनगर पुलाच्या ‘टी’ बांधकामाचा घोळ कायम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.