जळगाव : जिल्ह्यात सध्या वाळू उपसा बंद असला तरी अवैधरीत्या वाळू उपसा सुरूच आहे. यामुळे महसूल विभागातील तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्यावर घरातून बाहेर पडण्यापासून तर ते कोठे कोठे जातात, कोठे थांबतात.
यावर वाळू माफियांची नजर असते. त्याप्रमाणे सोयीनुसार वाळू माफिया वाळूची अवैध वाळू वाहतूक करतात. आता तर चक्क जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मागेच दहा ते पंधरा युवक मोटारसायकलीद्वारे पाठलाग केल्याचे समोर आले आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता याबाबत पोलिसांना याबाबत माहिती देवून पाठलाग करणारे कोण याची माहिती काढण्यास सांगितल्याचे त्यांनी सांगितले. (Collectors being followed by sand mafia Information given to police Jalgaon News)
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्यांवर पोलिस विभागाने अद्यापपर्यंत काहीही कारवाई करीत नसल्याने आता वाळूमाफीयांची चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाचा पाठलाग करण्यापर्यंत मजल गेल्याची चर्चा महसूल विभागात आहे.
अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अडवून त्यांच्यावर कारवाई केली तर अधिकाऱ्यांवर पाळत ठेवत हल्ले करण्याची घटना सध्या जिल्ह्यात घडत आहेत.
गेल्या सात महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी प्रसाद यांनी पदाची सूत्रे हाती घेतली. जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी थांबविणे, दादागिरी करणाऱ्या नागरिकांना त्रास देणाऱ्या, अवैधरीत्या वाळू नेणारे, अवैधरीत्या दारू पाडणारे यांच्या विरोधात त्यांनी पोलिसांनासोबत घेऊन कारवाई केली आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांबाबत वाळू माफीयांमध्ये दबदबा आहे.
सोशल मीडियावर जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवलेल्या स्टेटस् चर्चेचा विषय बनला आहे. जिल्हाधिकारी पदाच्या जबाबदारीसह त्यांच्याकडे अनेक गोपनीय खात्यांची कामे असतात.
जिल्हाधिकारी प्रसाद तरसोद ते पाळधी या महामार्गाने प्रवास करत असताना चक्क त्यांच्या वाहनामागे ५-६ दुचाकी पाठलाग करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
महत्त्वाचे म्हणजे हे दुचाकीवरील युवक वाळू माफियांचे पंटर होते. यावरून लक्षात येते जिल्हाधिकारी देखील सुरक्षित नसून त्यांची गोपनीयता देखील धोक्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.