Jalgaon News : जामनेर- पाचोरा- बोदवड हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी नवीन रेल्वेस्थानकाची जागा निश्चीत करण्यात आलेली आहे. मात्र त्या जागेऐवजी परिशिष्ट ‘अ’मध्ये दर्शविल्याप्रमाणे जागा रेल्वे स्थानकासाठी निश्चीत करावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भुसावळ रेल्वेच्या डीआरएम इति पांडे यांच्याकडे आज दिला.
भुसावळ डीआरएम कार्यालयात जामनेर- पाचोरा- बोदवड हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज’ बाबत आज बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हा प्रस्ताव डीआरएम यांना दिला. रेल्वेचे संबंधित अधिकारी, तहसीलदार पंकज लोखंडे यावेळी उपस्थित होते. (Collectors proposal to DRM to change station location for Jamner Bodwad broad gauge jalgaon news)
या रेल्वेमार्गाबाबत जामनेर येथील रेल्वे स्थानकाची जागा ही मौजे जामनेर येथील गट नं.१९५, १९७, १९८, १९३, १९९, २००, १९१, १९२, १९४, १९९,२१२, २१८, २१७, १९०, २१९, २२०, २१२, २२२, ११०, १०९, १०८, २२३, २२४,१०४, १०५, १०३, व २२४/पै या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे. त्या करिता एकूण क्षेत्र साधारपणे २९ हे.आर इतके भूसंपादन करावयाची आहे. या जागेऐवजी जामनेर येथील रेल्वे स्थानकाची जागा ही अनेक कारणांसाठी इतर गटांमध्ये ‘परिशिष्ट अ’ मध्ये दर्शविलेल्या गटांमध्ये स्थलांतरित करण्यात यावी. असा प्रस्ताव आहे.
पोहोच रस्ता नाही
प्रस्तावित नवीन रेल्वेस्थानकाच्या जागेची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी प्रसाद, रेल्वे विभागाचे अधिकारी, स्थानिक तहसीलदार, मुख्याधिकारी, इतर क्षेत्रीय अधिकारी यांच्या समवेत पाहणी केली असता, त्या जागेला ‘पोहोच रस्ता उपलब्ध नसल्याचे’ दिसून आले. भविष्यात जामनेर शहरातून रेल्वे स्थानकात नागरीकांना येण्याजाण्याकरीता रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी भुसंपादनाचा खर्च आवश्यक आहे. रेल्वे स्थानकावर जाण्याकरिता जामनेर नगरपालिका यांनी डी. पी. रोड प्रस्तावित केलेला असून त्याकरिता देखील भुसंपादनाचा मार्ग अवलंबून रस्ता तयार करावा लागणार आहे.
गर्दीचे व्यवस्थापन
परिशिष्ट अ मध्ये दर्शविलेल्या गटांमध्ये रेल्वे स्थानक प्रस्तावित केले असता जामनेर शहरातून राज्य महामार्गाव्दारे रेल्वे स्थानकावर पोहोचता येईल. या व्यतिरिक्त रेल्वे स्थानकावर जाण्याकरिता जामनेर शहरातून इतर पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. भविष्यात रेल्वेस्थानकावर येणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन सुकर पद्धतीने करता येईल.
जुन्या प्रस्तावित रेल्वे स्थानकावर सर्व गट हे भूसंपादन प्रकियेव्दारे संपादित करणे आवश्यक आहे. त्यामध्ये एक स्टेान क्रशरचा भाग (गट नं.२२४ पै) येत असून सदरील जमीन ही औद्योगिक अकृषक प्रयोजनासाठी वापर होत असून रेल्वे स्थानकाच्या भूसंपादनासाठी निवाड्याची रक्कम ही खूप मोठ्या प्रमाणात भूखंड धारकांना अदा करावी लागेल.
नवीन प्रस्तावित रेल्वे स्थानकामध्ये नगरपरिषद जामनेर यांचे मालकीचे गट बाधित होत असून, सदर गटातून सुमारे १५.८९ हे.आर इतके क्षेत्र संपादन करणे सहज शक्य आहे. सदरील जमीन ही नगरपरिषद रेल्वे विभागास देण्यास तयार असून त्याऐवजी पाचोरा जामनेर नॅरोगेज या रेल्वे मार्गावरील जामनेर येथील रेल्वे स्थानकाची विना वापर पडून असलेली जागा ही नगरपरिषदेला शहराची विकास योजना राबविण्यासाठी हस्तांतरित करता येऊ शकेल. असे केले असता मुल्यांकनामधील तफावत ज्या विभागाकडे जास्त देणे असेल त्यांनी दुस-या विभागाला सदरील रक्कम अदा करेल.
जर कधी नवीन प्रस्तावित रेल्वे स्थानकातील नगरपरिषदेच्या जमिनीची किंमत ही जुन्या नॅरोगेज रेल्वे स्थानकाच्या जमिनीच्या किंमतीपेक्षा जास्त असेल तर या परिस्थिती मध्ये फरकाची रक्कम रेल्वे विभाग नगरपरिषदेस अदा करेल.किंवा जर कधी नवीन प्रस्तावित रेल्वे स्थानकातील नगरपरिषदेच्या जमिनीची किंमत ही जुन्या नॅरोगेज रेल्वे स्थानकाच्या जमिनीच्या किंमतीपेक्षा कमी असेल तर या परिस्थिती मध्ये फरकाची रक्कम नगरपरिषद रेल्वे विभागास अदा करेल.
नवीन प्रस्तावित रेल्वे स्थानकामध्ये नगरपरिषद जामनेर यांचे मालकीचे गटावर मुरूमाची टेकडी अस्तित्वात असून आपणास सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेऊन सदरील जागेवर खोद काम करून त्यातून मिळणार मुरूम हा रेल्वे मार्ग तसेच रेल्वे स्थानक निर्माणासाठी उपलब्ध होईल. नवीन प्रस्तावित होणाऱ्या रेल्वे स्थानकासाठी मूल्यांकन दर यावेळी देण्यात आले.
नवीन जागेमुळे बचत
वरील सर्व बाबींमुळे रेल्वे विभागाची आर्थिक बचत होऊन प्रकल्प वेळेत पूर्ण करता येईल. या सर्व बाबींचा आपल्या स्तरावरून तांत्रिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या तपासणीकरून, जामनेर -पाचोरा -बोदवड या रेल्वेमार्गावर जामनेर येथील रेल्वे स्थानकाची जागा परिशिष्ट अ मध्ये दर्शविलेल्या गटांमध्ये स्थलांतरित करण्यात यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.