Jalgaon News : आयुक्तांनी वितरित केले खर्चाचे अधिकार

jalgaon municipal corporation
jalgaon municipal corporationesakal
Updated on

जळगाव : महापालिकेच्या उपायुक्तांना तीन लाख तर सहाय्यक आयुक्तांना एक लाख रुपये कामाच्या खर्चाच्या मर्यादेवर स्वाक्षरी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, कामाच्या सुसूत्रतेसाठी

आयुक्त विद्या गायकवाड (Vidya Gaikwad) यांनी हे अधिकार वितरित केले आहेत.(Commissioner distributed Expenditure authority For smoothness of work jalgaon news)

शहरातील प्रत्येक खर्चाच्या कामासाठी आयुक्तांकडेच प्रस्ताव स्वाक्षरीसाठी येत होते. त्यामुळे अनेक वेळा कामांचा खोळंबा होत असे. त्यामुळे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी महापालिकेचे उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांच्याकडे काही रकमेच्या खर्चासाठी स्वाक्षरीचे अधिकार दिले आहेत.

महापालिकेचे उपायुक्त यांना तीन लाख रुपये तर सहाय्यक आयुक्त यांना एक लाख रुपयांच्या खर्चाच्या बिलावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रभारी उपायुक्त गणेश चाटे, अभिजित बाविस्कर यांच्याकडे तीन लाख रुपये खर्चाच्या बिलावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार आले आहेत.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

jalgaon municipal corporation
Jalgaon News : 17 मजलीत होतेय भंगाराचे गोदाम; मनपाच्या जागांची मुक्त उधळण

तर प्रभारी सहाय्यक आयुक्त उदय पाटील, सुनील गोराणे यांना एक लाख रुपये खर्चाच्या बिलावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्तांनी वित्तीय खर्चाच्या अधिकाराचे वितरण केल्यामुळे कामात सुसूत्रता येण्याची शक्यता आहे.

jalgaon municipal corporation
Jalgaon News : 3 जागा शासनाने घेतल्या ताब्यात; महसूल विभागाची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.