Municipal Commissioner : महापालिका आयुक्तांची प्रशासकपदी नियुक्ती; शासनाच्या नगरविकास विभागातर्फे आदेश प्राप्त

Jalgaon municipal commissioner Vidya Gaikwad latest news
Jalgaon municipal commissioner Vidya Gaikwad latest newsesakal
Updated on

Jalgaon Municipal Commissioner : जळगाव महापालिकेच्या पदाधिकारी व नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत रविवारी (ता. १७) पूर्ण होत आहे.

निवडणुका घेणे शक्य नसल्याने आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास विभागाचे आदेश महापालिकेला प्राप्त झाले आहेत. (Commissioner Dr Vidya Gaikwad has been appointed as administrator in jalgaon municipality jalgaon news)

नगरविकास विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुळकर्णी छापवाले याबाबतचे आदेश शुक्रवारी (ता. १५) जारी केले आहेत. त्यात म्हटले आहे, की राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या सर्व स्थानिक संस्थांच्या निवडणुका विहित वेळेत घेणे शक्य नसल्याने, तसेच संबंधित नागरी संस्थांची मुदत संपताच तेथे प्रशासक नियुक्ती करण्याबाबत कळविले आहे.

त्यामुळे महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदी व विशेष कलम ४५१ ‘अ’ च्या १(अ), १(ब )मधील तरतुदीनुसार रविवारी (ता. १७) मुदत संपत असलेल्या जळगाव महापालिका येथे प्रशासकपदावर आयुक्त जळगाव महापालिका यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon municipal commissioner Vidya Gaikwad latest news
Jalgaon News : उधना-पाळधी मेमू रेल्वे भुसावळपर्यंत धावणार

त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपताच प्रशासकपदाचा कार्यभार स्वीकारावा व अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्‍यक कार्यवाही करावी. शासनाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त डॉ. गायकवाड या प्रशासकपदाचा पदभार सोमवार (ता. १८) पासून घेतील.

महापौर, उपमहापौर शनिवारी पदभार सोडणार

महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत रविवारी (ता. १७) पूर्ण होत आहे. त्यामुळे महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील शनिवारी (ता. १६) आपला पदभार सोडणार आहेत.

त्यापूर्वी ते पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपला पदभार सोडणार आहेत.

Jalgaon municipal commissioner Vidya Gaikwad latest news
Sakal Impact : सीएमव्हीग्रस्त केळी बागांच्या पंचनाम्यांचे तातडीने आदेश द्या; रक्षा खडसेंची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.