Jalgaon MSW Entrance Exam : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील समाजकार्य विभाग आणि विद्यापीठाशी संलग्नित समाजकार्य महाविद्यालयांमधील एमएसडब्ल्यु अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ३० जुलै रोजी सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. (Common Entrance Test will be conducted on 30th July for admission to MSW course jalgaon news)
या प्रवेश परीक्षेसाठी विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर १० जुलैपासून ऑनलाइन प्रवेश अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
२२ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज व ऑनलाइन शुल्क जमा करण्याची मुदत आहे. २३ जुलैस अर्जाची प्रिंट आउट व ऑनलाइन फी भरण्याची पावती आणि शैक्षणिक कागदपत्रे अर्ज स्वीकृती केंद्रावर जमा करावयाचे आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
२४ जुलैस महाविद्यालयांनी विद्यापीठात त्यांच्याकडे प्राप्त झालेले अर्ज जमा करावयाचे आहेत. प्रवेशाला प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती यादी २५ जुलैस जाहीर केली जाईल व त्यावर हरकती मागवल्या जातील.
२७ जुलैला परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची अंतिम यादी व प्रवेशपत्र जाहीर केली जाईल. ३० जुलैस लेखी परीक्षा होणार असून २ ऑगस्टला निकाल जाहीर केला जाईल. प्रवेश परीक्षेसाठी पदवीच्या अंतिम वर्षाला प्रविष्ट असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.