Jalgaon News: योजनेपासून वंचित ठेवल्याची चौकशी करा; आमदार भोळेंची मंत्री भुजबळांकडे तक्रार

MLA Suresh Bhole giving a statement to State Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal.
MLA Suresh Bhole giving a statement to State Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal. esakal
Updated on

Jalgaon News : रेशनकार्ड असलेल्यांना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेपासून वंचित ठेवले जात असल्याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार सुरेश भोळे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. (Complaint of MLA Bhole to Minister Bhujbal to Investigate deprivation of plan jalgaon news )

याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, की देशातील गरीब व गरजू शिधापत्रिकाधारकांना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय) या योजनेंतर्गत धान्य पुरवठा केला जातो.

‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेतून गरीब व गरजूंना मोफत अन्न-धान्य पुरविणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

MLA Suresh Bhole giving a statement to State Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal.
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांना धक्का? महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अडचणी वाढण्याची शक्यता

परंतु या योजनेचे जानेवारी २०२२ चे धान्य वितरण करीत असताना जळगाव शहरातील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना वंचित ठेवण्यात आल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आपल्याला प्राप्त झाल्या आहेत.

या तक्रारी आमदार भोळे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याकडे दिल्या असून, चौकशीची मागणी करून शिधापत्रिकाधारकांना न्याय मिळवून द्यावा व गोरगरिबांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्यांवर कार्यवाही होण्यासाठी मागणी केली आहे.

MLA Suresh Bhole giving a statement to State Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal.
Jalgaon News: जिल्ह्यात 8 महिन्यांत 2 कोटींवर महिलांचा एसटी प्रवास; महिला सन्मान योजनेमुळे महामंडळाला नवसंजीवनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.