जळगाव : शहरातील ‘अमृत’ योजनेच्या कामाला अनेकवेळा मुदतवाढ दिली आहे, तसेच रस्त्यांची कामेही रखडली आहेत. त्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत. यामुळे आता या कामांना विलंब न करता ती त्वरित पूर्ण करावीत, असे आदेश महापौर जयश्री महाजन यांनी शुक्रवारी (ता. १७) दिले.
हेही वाचा: संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या प्रकल्प विभागाच्या बैठकीत त्या बोलत होत्या. शहरातील ‘अमृत’ योजनेला अनेकवेळा मुदतवाढ दिली आहे. तरीही हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. कामाच्या विलंबामुळे शहरातील रस्त्याची कामेही बंद आहेत. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दोन्ही कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी जनतेची मागणी आहे. हीच मागणी लक्षात घेऊन महापौर जयश्री महाजन यांनी शुक्रवारी प्रकल्प विभागाची बैठक घेतली.
आयुक्त देवीदास पवार, प्रकल्प विभागाचे अधिकारी योगेश बोरोले, प्रभारी शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे उपस्थित होते. या वेळी ‘अमृत’ योजनेच्या कामात उशीर का होत आहे, याची माहिती घेण्यात आली. त्यावर अधिकाऱ्यांनी सांगितले, की वाढीव भागात तब्बल ४० किलोमीटरची पाइपलाइन टाकावयाची आहे. मात्र, यात काही अडचणी येत आहेत. पाणीपुरवठा, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन पाहणी करून ही अडचण दूर करावी, असे आदेश आयुक्त पवार यांनी दिले.
रस्ते कामांचाही आढावा
शहरातील रस्ते कामाचाही आढावा या वेळी घेण्यात आला. कोणत्या फंडातील किती कामे बाकी आहेत, तसेच किती कामे सुरू आहेत, याबाबत माहिती घेण्यात आली. त्या रस्याच्या कामात काय अडचणी आहेत, याचीही माहिती घेण्यात आली. रस्त्यांची कामेही त्वरित पूर्ण करावीत, असे आदेश देण्यात आले. मार्चपर्यंत ‘अमृत’ व रस्त्यांची कामे कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीत. आता कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, असा स्पष्ट इशाराही या वेळी देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.