Jalgaon : Fournier gangreneच्या रुग्णावर गुंतागुंतीची Surgery यशस्वी

Critical surgery
Critical surgeryesakal
Updated on

जळगाव : जामनेर तालुक्यातील एका ६५ वर्षीय वृद्धाला ‘फोरनिअर गँगरीन’ हा आजार झाला होता. या आजारामुळे रुग्णाच्या जिवावर बेतले होते. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णाला जळगाव येथील गुदविकार तज्ज्ञ डॉ. मनोज पाटील यांच्याकडे आणले. डॉ. पाटील यांनी त्यांच्या सर्व तपासण्या करून यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे रुग्ण धोक्याबाहेर असून, रुग्णाला चालता फिरता येऊ लागले आहे.
फोरनिअर गँगरीनमुळे शौच व लघवीच्या जागी सज आली होती. लघवीला मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. रुग्णाच्या शरीरात जंतूसंसर्ग अधिक झाल्यामुळे लघवी बंद झाली होती. लघवीच्या जागेपासून ते संडासच्या जागेपर्यंतच्या जागेला आतून जंतूसंसर्ग झाल्याने दुर्गंधी येत होती. त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. (Complicated surgery on a patient Fournier gangrene successful Jalgaon News)

Critical surgery
District Milk Union : चव्हाणांच्या अर्जावर मंदाकिनी खडसेंची हरकत

अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या नातेवाइकांनी रुग्णाला डॉ. पाटील यांच्याकडे आणले. त्यांनी सर्व गोष्टी लक्षात घेऊन रुग्णाचा एमआरआय, सोनोग्राफी व इतर टेस्ट केल्या. रुग्णाच्या परिस्थिीतीचा अंदाज नातेवाइकांना दिला आणि रुग्णावर सर्जरी करावी लागेल, या सर्जरीत रुग्णाच्या जिवाला धोका होऊ शकतो, याची कल्पना दिली. त्यानंतर नातेवाइकांनी तुम्ही शस्त्रक्रीया करा, आमची संमती असल्याचे सांगितले.
डॉ. पाटील यांनी ओम क्रिटीकलमध्ये रात्री ११ ते १ या वेळेत शस्त्रक्रिया केली. त्यानंतर रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल केले. तेथे तीन दिवस ठेवल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा पाहून दुसऱ्या वॉर्डात दाखल केले. १५ दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून पुन्हा दोन वेळा शस्त्रक्रिया केल्या आणि आता रुग्णाची पुर्णपणे तब्येत ठणठणीत असून, रुग्णांच्या जिवाला असलेला धोका टळला आहे.
"मुळव्याध, फिशर, भगंदर या आजारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ‘फोरनिअर गँगरीन’ जीवघेणा आजार होऊ शकतो."
-डॉ. मनोज पाटील, गुदविकार तज्ज्ञ

Critical surgery
Eknath Khadse Statement : सुरेशदादा जैन यांच्या विकासकामांचा दर्जा चांगला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.