Jalgaon Sand News : आर्टिफिशियल वाळूचा आता रस्त्यांसाठी वापर; वाळू बंदचा फटका

Jalgaon Sand News : आर्टिफिशियल वाळूचा आता रस्त्यांसाठी वापर; वाळू बंदचा फटका
esakal
Updated on

Jalgaon Sand News : वाळू बंदचा फटका जळगाव शहरातील रस्ते कामांनाही बसला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वाळू उपलब्ध होत नसल्यामुळे आर्टिफिशियल वाळूद्वारे शहरातील कॉंक्रिटचे रस्ते करण्याचे काम करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश मक्तेदारांना मंगळवारी (ता. ३) देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

शहरातील रस्त्याची कामे महापालिकेच्या फंडातून करण्यात येत आहेत. महापालिकेतर्फे रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाची कामे करण्यात येत आहेत. त्यासाठी निवीदा काढून मक्तेदारांना कामाचे आदेशही देण्यात आले आहेत.

शहरातील विविध भागांत तब्बल २५ रस्त्यांच्या कामांचे आदेश निघाले आहेत. मात्र, ही कामेच सुरू झालेली नाहीत. कॉंक्रिटीकरणाची कामे करण्यासाठी वाळू उपलब्ध होत नसल्यामुळे मक्तेदारांनी ही कामे सुरू केली नाहीत. (Concrete roads in city will be constructed using artificial sand jalgaon news)

जिल्हाधिकाऱ्यांकडून नकार

शासकीय कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे वाळू राखीव ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार महापालिकतर्फे मक्तेदारांच्या माध्यमातून रस्त्याच्या कामासाठी वाळू मागणीचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले होते.

मात्र, त्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नकार देण्यात आला आहे. राखीव असलेली वाळू ही घरकुलांच्या कामासाठी वापरण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

तोंडी आदेश

शहरात कॉंक्रिटीकरण कामासाठी वाळूची मागणी करण्यात आली होती. एमआयडीसीतील उद्योजकांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. त्यावेळी उद्योजकांनी आम्हाला प्लॅट उभारणीसाठी वाळू उपलब्ध होत नसल्याचे सांगितले होते. त्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी आता वाळू उपलब्ध होणार नाही, त्यामुळे कुणीही तक्रार न करता बांधकाम करण्यासाठी आर्टिफिशीयल वाळू वापरावी, असे तोंडी आदेशच दिले.

Jalgaon Sand News : आर्टिफिशियल वाळूचा आता रस्त्यांसाठी वापर; वाळू बंदचा फटका
Pitru Paksha: ग्रामीण भागातही कावळे दिसेनासे! पितृपक्षातच कावळ्यांचे स्मरण, पक्षीमित्रांची खंत

महापालिकाही देणार पत्र

शहरात रस्त्यांतील खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त आहेत. अनेक ठिकाणी आंदोलनही होत आहेत. अशा परिस्थितीत कामे बंद ठेवणे महापालिकेला अवघड जात आहे. त्यामुळे नागरिकांचा अधिक रोष होवू नये, यासाठी महापालिकेतर्फे आता रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामासाठी आर्टिफिशीयल वाळू वापरण्याबाबत मक्तेदारांना पत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मंगळवारी काढणार आदेश

वाळू उपलब्ध होत नसल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे आता आर्टिफिशीयल वाळू वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांची अंतीम मंजूरी महापालिका आयुक्तातर्फे घेण्यात येणार असून, येत्या मंगळवारी त्याबाबतचे आदेश मक्तेदारांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

"शहरातील कॉंक्रिटच्या रस्ते कामासाठी वाळू उपलब्ध होत नाही. मक्तेदारांना कामाचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच, रस्ते कामाबाबत नागरिकांच्याही तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे रस्ते कामासाठी आर्टिफिशीयल वाळू वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आयुक्तांनी निर्णय दिल्यानंतरच त्याबाबत आदेश काढण्यात येईल." -चंद्रकांत सोनगिरे, शहर अभियंता, महापालिका, जळगाव

Jalgaon Sand News : आर्टिफिशियल वाळूचा आता रस्त्यांसाठी वापर; वाळू बंदचा फटका
Jalgaon News : शेतकऱ्याने बाटलीत साकारल्या अनेक कलाकृती! अरुण पाटील यांचा आगळावेगळा छंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()