पहूर (जि. जळगाव) : येथील जामनेर रस्त्यावर मंगळवारी (ता. २१) सायंकाळी ३ ते ४ च्या दरम्यान सोनाळे शिवरस्त्यावर एका शेतात शिंगायत येथील मित्रानेच मित्राची दगडाने ठेचून हत्या (Murder) केली होती. (Confession from suspects in Shingayat murder case jalgaon crime news)
या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, पहूर पोलिस ठाणे व जामनेर पोलिस ठाणे यांनी संयुक्तपणे तपास करत संशयितास अवघ्या २४ तासांच्या आत जेरबंद केले होते. मृत प्रमोद उर्फ बाळू भगवान वाघ (वय ३७) व संशयित रवींद्र उर्फ बाळू भगवान हडप (वय ४१) (रा. शिंगायत, ता. जामनेर) हे दोघे मित्र होते. २१ मार्चला सकाळी ११ ते साडेअकराच्या सुमारास जामनेर येथे त्यांची भेट झाली.
मृत प्रमोद उर्फ बाळू याच्या टीव्हीएस मोटरसायकल (क्रमांक एमएच १९, डीझेड ९७३१) ने पहूर जाण्यासाठी निघाले होते. सोनाळे फाट्यावर असलेल्या स्टड गार्डन या बिअरबारवर त्यांनी दारू पिऊन पहूरकडे प्रयाण केले. पत्ते खेळण्यासाठी जात असल्याचे मोबाईलवरून शालकास माहिती दिली.
पहूर येथे जुगारअड्डड्यावर पत्ते खेळात पैसे हारले. नंतर तेथेच मोटरसायकल गहाण ठेवून पैसे घेऊन परत पत्यात पैसे जिंकून मोटारसायकल सोडवली. पहूर येथील देशी दारूच्या दुकानात दारू पिऊन दोन बाटल्या सोबत घेतल्या. पहूर बसस्थानक परिसरातील हॉटेलात जाऊन वडापाव पार्सल घेतले.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
चहाच्या दुकानातून पाण्याची बाटली तसेच शेरीफाट्यावरील रसवंतीवरून ग्लास घेऊन जामनेर रस्त्यावर सोनाळे शिवरस्त्यावर असलेल्या शेतात दारू सोबत वडापाववर ताव मारला. दारू जास्त झालेल्या प्रमोद याने संशयिताशी वाद घालून शिवीगाळ करत काठीने पाठीवर मारहाण केली. याचा संशयित रवींद्र उर्फ बाळू यास राग आला.
रागाच्या भरात शेतात पडलेला दगड प्रमोदच्या डोक्यात टाकला. प्रमोद उर्फ बाळू मयत झाल्याची खात्री करून त्यास शेतात फरफटत नेत मृताची मोटरसायकल व मोबाईल घेऊन पोबारा केला. मोटरसायकल जामनेर येथील बीओटी काँम्प्लेक्सखाली लावून शिंगायत गाठले, असा घटनाक्रम संशयित रवींद्र उर्फ बाळू भगवान हडप याने त्यास घटनेची माहिती देताना सांगितला.
पोलिस निरीक्षक प्रतापराव इंगळे, पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे, संजय बनसोड, पोलिस कर्मचारी विनय सानप, गोपाल गायकवाड हे या घटनेचा तपास करीत आहे.
व्यसनाने केला घात
मृत प्रमोद आणि मारेकरी रवींद्र दोघे एकमेकांचे मित्र होते. परंतु दारूच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि यातूनच मित्राकडूनच मित्राची हत्या झाली. मृताच्या रक्ताचे नमुने, रक्ताने माखलेला दगड, माती, कपडे, व्हिसेरा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला असून, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पोलिसांनी जामनेर येथून जप्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.