Jalgaon News : भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली आहे. मात्र, नोट बदलविण्यासाठी भरपूर कालवधी असल्याने स्थानिक बँकांमध्ये गर्दी होणार नाही, असा अंदाज व्यक्त होत आहे.
या निर्णयाबद्दल नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले असून, बहुतांश नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. (Confusion regarding exchange of two thousand notes Inciting discussions among citizens Jalgaon News)
दरम्यान, नोटा बदलण्याची मर्यादा एकावेळी २० हजार रुपये म्हणजे दोन हजारांच्या दहा नोटा देता येतील. याप्रमाणे एकावेळी एवढाच व्यवहार करता येईल. मुख्य म्हणजे बँकेत खाते नसलेल्या व्यक्तीलाही बँक नोटा बदलून देणार आहे.
बँक खात्यात जमा करता येणार नोटा
दोन हजारांच्या नोटांसंदर्भात रिझर्व्ह बँकेकडून आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार, ज्यांच्याकडे दोन हजारांच्या नोटा असतील, त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येणार आहेत. बँकेत स्वतःच्या खात्यात नोटा जमा करता येणार आहेत.
शिवाय ज्या व्यक्तीला दोन हजार रुपयांच्या बदल्यात इतर नोटा बदलून हव्या असतील, त्यांना बँकांकडून नोटा दिल्या जाणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने केली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दोन हजारांच्या सुमारे ८९ टक्के नोटा मार्च २०१७ पूर्वी जारी केल्या होत्या. चलनात असलेल्या या नोटांचे एकूण मूल्य ३१ मार्च २०१८ ला ६.७३ लाख कोटी आहे. प्रत्यक्षात ३१ मार्च २०२३ ला केवळ १०.८ टक्के नोटा चलनात आहेत.
या नोटा सामान्यतः व्यवहारासाठी वापरल्या जात नसल्याने इतर मूल्यांच्या नोटांचा साठा लोकांच्या चलनाची गरज भागविण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे स्वच्छ नोट धोरणांतर्गत हा निर्णय घेतला आहे.
"दोन हजारांच्या नोटांबाबत रिझर्व्ह बँकेकडून आदेश प्राप्त झाले आहेत. नोटा बदलण्यासाठी कालावधी मोठा असल्याने नागरिकांना गर्दी न करता नोट बदली करून घेता येतील. स्वतःच्या बँक खात्यातही नोटा जमा करता येतील."
-अरुण प्रकाश, व्यवस्थापक, लीड बँक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.