Jalgaon Crime : रस्त्याच्या कडेला असलेली झाडे तोडून त्याची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास धक्काबुक्कीसह ठार मारण्याचा प्रकार बुधगाव फाटा ते बुधगावदरम्यान बुधवारी (ता. १३) घडला. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करून ट्रकसह लाकूड जप्त करण्यात आले आहे.
चोपडा ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या रस्त्याच्या कडेला सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लावण्यात आलेल्या मोठमोठ्या झाडांची येथील वखारमालक कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सर्रास कत्तल करीत असल्याबाबत नागरिकांकडून सतत तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागात करण्यात येत होत्या. (Construction department engineer beaten by tree cutters jalgaon crime news)
दरम्यान, बुधवारी (ता. १३) दुपारी तीनच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कनिष्ठ अभियंता बालाजी दहिफळे यांना गुप्त बातमी मिळाली, की बुधगाव फाटा ते बुधगावदरम्यान असलेल्या रोडलगत बाभळीचे झाडाची कटाई सुरू आहे.
तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत असलेले सहाय्यक हर्षदीप राजपूत यांना सोबत घेऊन बुधगाव फाट्यापासून बुधगावकडे सुमारे तीन किलोमीटर अंतरावर बुधगावकडून बुधगाव फाट्याकडे जात असताना एक आयशर ट्रक (एमएच १५, बीजे ७९५६) येताना दिसल्याने त्यांना संशय आला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यांनी वाहनचालकास वाहन थांबविण्याचा इशारा देऊन वाहन थांबविले. बालाजी दहिफळे यांनी ट्रकची तपासणी केली असता, त्यात दहा हजार रुपये किमतीचे अडीच टन लाकूड अवैध तोडून भरलेले आढळले.
तेव्हा या वाहनचालकास वाहन पोलिस ठाण्यात घेऊन चल, असे सांगत असताना तेथे अय्यूब युसूफ सरदार (रा. बारा मोहोल्ला, मणियार अली, चोपडा) हा आला. त्याने दहिफळे यास, ‘तुम्ही माझी गाडी का अडवली.
तुम्हाला काय अधिकार आहे’, असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच त्यांचा हात पिळून धक्काबुक्की केली. तसेच वाहन पळवून नेण्यास लावले व ठार मारण्याची धमकी दिली. दहिफळे यांनी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार देवीदास ईशी तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.