Jalgaon News : रामानंदनगर पोलिस ठाण्याचा कारभार गेल्या दहा ते अकरा वर्षांपासून भाडे तत्त्वावरील खोलीत सुरु होता. पावळ्यात गळके छत, उन्हाळ्यात पोळून काढणारी ठाणे अंमलदारकी, तर हिवाळ्यात थंडीचा कहर अशा विपरीत परिस्थितीत एक तपापासून स्वमालकीच्या जागेचे स्वप्न येथील कर्मचारी पाहत होते. ते, स्वप्न आता प्रत्यक्षात अवतरणार असल्याने कर्मचाऱ्यांनी अक्षरशः आनंदोत्सव साजरा करत फोटो व्हायरल केले.
परिसरातील अनेक जागा बघितल्या गेल्या. मात्र जागाच निश्चित होत नव्हती. अखेर महाबळ रोडवरील संभाजीराजे नाट्यगृहासमोरील अठरा गुंठे जागा या पोलिस ठाण्यास मिळाली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत आदेश पारित केला आहे. (Construction of Ramanand Nagar police station on new site will start soon jalgaon news)
असा आहे आदेश
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, मौजे मेहरुण (ता. जि. जळगाव) येथील सिटी सर्व्हे नंबर ६४७८चे एकूण क्षेत्र ४३९८८.३ चौ. मि. पैकी १८०० चौरस मिटर जागा रामानंदनगर पोलिस ठाण्यासाठी उपलब्ध करुन देण्याचा आदेश २६ सप्टेंबरला पारित करण्यात आला. या आदेशाची अंमलबजावणी होऊन उपलब्ध जमिनीवर रामानंदनगर पोलिस ठाण्याचा हक्क बहाल होवुन ७/१२ उताऱ्यावर नाव लागले आहे.
कर्मचाऱ्यांचा जल्लोष
तशा नोंदीचा सातबारा उतारा महिला पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांना प्राप्त झाल्यावर रामानंदनगर पोलिस ठाण्यात कार्यरत ठाणे अंमलदार, गोपनीय कक्ष, डिबी कर्मचारी, दुय्यम अधीकारी, महिला कर्मचारी आदींनी अक्षरशः आनंदोत्सव साजरा केला. जिल्हा नियोजन मंडळाकडून पोलिस दलासाठीच्या मंजुर ११ कोटीच्या निधीतून रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या कामासाठी तरतूद करण्यात आली असून, विस्तीर्ण इमारत उभी केली जाणार आहे.
सर्वच ऋुतूंचा इथे त्रास..
उन्हाळ्यात शहराचे तापमान ४८ अशांपर्यंत पोहचते. अशाही तापमानात पत्र्याच्या शेडमध्ये २४ तास ठाणेअंमलदार काम करत असत. जुने बांधकाम असल्याने थोडा पाउस पडला की, आवारात चिखल व्हायचा. बांधकामाच्या सर्वच खोल्या गळून कागदपत्रांचे नुकसान होत होते. प्रभारीच्या टेबलावर पावसाळ्यात छताचे थेंब झेलावे लागत होते. महिला कक्ष नसल्याने थंडीत महिला कर्मचाऱ्यांना रात्रपाळी किंवा जाप्ता आला तर, जागूनच रात्र काढावी लागत होती.
ना लिखापढीची सोय, ना कोठडीला जागा
कोल्हेनगर येथील चाळ वजा खोल्यांमध्ये हे पोलिस ठाणे बारा वर्षापुर्वी सुरु करण्यात आले. सिमेंट काँक्रीटचे बांधकाम असलेल्या ‘रो’मध्ये वनरुम किचनच्या तीन खोल्या, काही मोकळी जागा व एक ओट्याचा भाग तेव्हा पोलिस ठाण्याला मिळाला. ओट्याच्या जागेवर पत्र्याचे शेड टाकून ठाणे अंमलदाराची व वायरलेस ऑपरेटरची सोय करण्यात आली.
शेजारी संगणक कक्ष आणि तेथेच दुय्यम अधिकाऱ्याचा टेबल, मागे दहा बाय दहाच्या जागेत डीबी रुम, हजेरी मास्तर रोजनिशी अन् प्रभारी अधीकाऱ्यांच्या खोलीमागे गोपनीय विभाग, अशा अडचणीच्या जागेत रामानंदनगर ठाण्याचा गाडा सुरु होता. कोठडी नसल्याने आरोपी पकडला, तर त्याला ठेवायची सोय नव्हती. म्हणून दोन वेळेस अट्टल गुन्हेगार पळून गेले.
विभाजनानंतर न्याय
जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे विभाजन होऊन १५ ऑगस्ट २०१२ मध्ये रामानंदनगरचे कामकाज सुरु झाले. विपरीत परिस्थीतीत तब्बल ५ ते ६ वर्षे इथं कर्मचाऱ्यांनी नोकरी केली. दोन टर्म बदली कर्मचारी गेल्यावर जिल्ह्यातून कुठलाच कर्मचारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात बदलीसाठी होकार देईना, अशी अवस्था झाली होती. आता छत्रपती संभाजी नाट्यगृहासमोरच पोलिस ठाण्यासाठी जागा निश्चित झाली असून, येथे विस्तीर्ण इमारत बांधली गेल्यावर जुन्या घराचा सासरवास संपेल या कल्पनेनेच कर्मचाऱ्यांना आनंद झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.