Jalgaon News : शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वरील समांतर रस्त्यालगत असलेल्या सायली हॉटेलच्या काही अंतरावर एका हॉटेलवर सार्वजनिक जागी बायोडिझेलने भरलेला कंटेनर आढळून आला.
स्थानिक गुन्हे शाखा व बाजारपेठ ठाण्याचे पोलिस कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता.११) सायंकाळी सातच्या सुमारास संयुक्तरीत्या कारवाई करून हा कंटेनर जप्त केला आहे. (container full of biodiesel was seized jalgaon news)
जप्त केलेला कंटेनर तालुका पोलिस ठाण्याच्या आवारात लावण्यात आला आहे. अंदाजे यात चोवीस लाख रुपयांचा माल असल्याची शक्यता आहे.
या कारवाईसाठी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून तहसील कार्यालयाचे पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांना पत्र देण्यात आले आहे. त्या पत्राच्या आधारे पुरवठा अधिकारी यांनी जळगाव येथील पेट्रोलपंपाचे नोझल अधिकारी यांच्याशी संपर्क साधला.
तसेच पुढील कारवाईसाठी कंटेनर (एमएच २३, डब्ल्यू. ३४९७) मधील सॅम्पल घेण्यासाठी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पाठविण्यात आलेले पत्र सुपूर्द केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
'त्या पत्राच्या आधारे सायंकाळी पाचला पुरवठा अधिकारी व कर्मचारी यांनी तालुका पोलिस ठाणे गाठून त्या ठिकाणी लावण्यात आलेले कंटेनरमधील सॅम्पल घेऊन पंचनामा केला असल्याची माहिती पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
सदरील कारवाई ही मंगळवारी (ता.११) सायंकाळी सातला झाली आहे. या संदर्भात अद्याप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या प्रकरणात संशयित तीन जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
"भुसावळ शहरात बाजारपेठ पोलिसांनी मंगळवारी (ता.११) बायोडिझेल कारवाई केली आहे. पुढील कारवाईसाठी बाजारपेठ पोलिस ठाण्याने पुरवठा विभागाकडे पत्र पाठवले आहे. त्या अनुषंगाने जळगाव येथील पेट्रोलपंपाच्या नोझल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला." - अतुल नागरगोजे, पुरवठा अधिकारी, भुसावळ.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.