Jalgaon News : जळगाव महापालिकेत ८६ पदांसाठी तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीने कर्मचारी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महापालिकेच्या संकेतस्थळावरून जाहिरातीचा तपशील घेऊन उमेदवारांनी अर्ज करावयाचे असून, ऑफलाइन पद्धतीने अर्ज महापालिकेत स्वीकारण्यात येणार आहेत. (Contract recruitment for 86 posts in Jalgaon Municipal Corporation Jalgaon News)
महापालिकेतर्फे विविध संवर्गातील पदे तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीने सहा महिन्याच्या हंगामी (१७९ दिवस) निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यात कनिष्ठ अभियंता बांधकाम दहा पदे आहेत, तर इतर पदांची संख्या अशी : कनिष्ठ अभियंता (पाणीपुरवठा)-तीन, कनिष्ठ अभियंता (विद्युत)-चार, रचना सहाय्यक-चार, आरेखक-दोन, अग्निशमन फायरमन-१५, वीजतंत्री-सहा, वायरमन-१२, आरोग्य निरीक्षक-दहा, टायपिस्ट (संगणकचालक)-२० एकत्रित मानधनांतर्गत वेतन देण्यात येणार आहे.
किमान वयोमर्यादा अठरा वर्षे असून, कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे आहे. सर्व राखीव प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे आहे.
ऑफलाइन अर्ज स्वीकारणार
महापालिकेतर्फे उमेदवार भरतीसाठी जाहिरात, अर्जाचा नमुना, पदांची संख्या, आवश्यक किमान शैक्षणिक अर्हता, अनुभव, नियम अटी व शर्ती जळगाव शहर महापालिकेच्या www.jcmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.
अर्ज स्वीकारणे ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. २० ऑक्टोबर २०२३ ही अंतिम मुदत आहे. महापालिकेच्या सतरा मजली प्रशासकीय इमारतीत दहाव्या मजल्यावर आस्थापना विभागात सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच, या वेळेत सुटीचे दिवस वगळून अर्ज दाखल करावेत.
ही भरती ऑफलाइन पद्धतीने असल्याने ऑनलाइन पद्धतीने कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचेही आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी जाहिरातीत नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.