Jalgaon News : 10 हजारांची लाच घेताना सहकार अधिकाऱ्यास अटक

Bribe News
Bribe Newsesakal
Updated on

जळगाव : जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दाखल दाव्यातील निकालाच्या सत्यप्रती देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक सहकार अधिकाऱ्यास शुक्रवारी (ता. ९) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुद्देमालासह पकडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणातील तक्रारदाराने २०१३ मध्ये दुसखेडा (ता. यावल) येथील गट क्रमांक १६५ मधील ९७ आर इतकी टायटल क्लीअर शेतजमीन विहीत खरेदीखत करून विकत घेतली आहे. २०१४ मध्ये शेतजमिनीचे पूर्वाश्रमीचे मूळ मालक नीलेश पाटील यांनी ती शेतजमीन परत मिळण्यासाठी भुसावळ येथील न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला असून, तो न्यायप्रविष्ट आहे. (Cooperation officer arrested while accepting bribe of 10 thousand Jalgaon Crime News)

हेही वाचा : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

Bribe News
Eknath Khadse Statement : दूध संघातील गैरव्यवहार तपासात उघड होईलच

२०१८ मध्ये पुन्हा नीलेश पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जळगाव या कार्यालयातही शेतजमीन परत मिळण्यासाठी दावा दाखल केला आहे. दाव्याच्या प्रत्येक सुनावणीसाठी तक्रारदार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव कार्यालयात दाव्याचे कामकाज पाहणारे संशयित सहाय्यक सहकार अधिकारी शशिकांत नारायण साळवे (रा. पिंप्राळा, जळगाव) यांच्यासमोर हजर राहिले आहेत.

या दाव्याचा निकाल लागला होता, म्हणून तक्रारदाराने साळवे यांना कार्यालयात जाऊन भेटून त्यांच्याकडून निकालाची प्रत मिळविली. निकालाच्या अंतिम आदेशात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम अन्वये आदेश असे नमूद असून, त्याची प्रत पोलिस अधीक्षकांना देण्यात आली व तक्रारदारांना दाव्याच्या निकालाप्रमाणे त्यांच्या स्वतःवर सावकारी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो, तसेच शेतजमीन परत करण्याचे आदेशित केले होते, म्हणून तक्रारदाराने त्याविरुद्ध अपिल करण्याचे ठरवून त्यासाठी लागणाऱ्या निकालाच्या सत्यप्रती घेण्याचा लेखी अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे दिला होता.

सत्यप्रती घेण्यासाठी तक्रारदाराकडून साळवे यांनी २० हजार रुपयांची मागणी केली. पैकी दहा हजारांची रक्कम स्वीकारताना त्यांना शुक्रवारी पकडण्यात आले.पोलिस उपअधीक्षक शशिकांत एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. के. बच्छाव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोलिस नाईक बाळू मराठे, राकेश दुसाने आदींनी ही कारवाई केली.

Bribe News
Jalgaon Crime News : परताव्याचे आमिष दाखवून दीड कोटीचा गंडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.