जळगावात कोरोना रुग्ण वाढतयं; लग्नसमारंभ, बाजार, गर्दीच्या ठिकाणांवर पून्हा मनपाची नजर 

जळगावात कोरोना रुग्ण वाढतयं; लग्नसमारंभ, बाजार, गर्दीच्या ठिकाणांवर पून्हा मनपाची नजर 
Updated on

जळगाव : शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असून, त्यावर मंगळवारी महापालिकेत चिंतन करण्यात आले. लग्नसमारंभ, आठवडेबाजार, बाजार समिती, गर्दीच्या ठिकाणी नागरिकांकडून शासनाच्या निर्देशांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी महापालिकेचे पथक लक्ष ठेवणार आहे. नियम मोडल्यास कारवाई करण्याच्या सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या आहेत. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी घेतलेल्या बैठकीला उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, उपायुक्त श्‍याम गोसावी, नगरसेवक कैलास सोनवणे, महापालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांच्यासह महापालिकेचे इतर डॉक्टर उपस्थित होते. 

मुबलक टेस्ट किट उपलब्ध 
जळगाव शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असले. तरी महापालिका प्रशासन सतर्क आहे. संशयित रुग्णांची दररोज कोरोना चाचणी केली जात असून, मुबलक प्रमाणात आरटीपीसीआर किट आणि अॅन्टिजन टेस्ट किट उपलब्ध असल्याची माहिती डॉ. रावलानी यांनी दिली. जळगाव महापालिकेने कोरोना काळात कंत्राटी पद्धतीने आरोग्यसेवकांची भरती केली होती. सध्या शहरात रुग्ण वाढत असल्याचे लक्षात येत असल्याने पुन्हा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी कार्यवाही करावी, असे उपायुक्त श्‍याम गोसावी यांनी सांगितले. महापौर भारती सोनवणे यांनी याबाबत प्रस्ताव तयार करून आयुक्तांकडे पाठवावा, अशा सूचना केल्या. 

महिन्यातून तीन वेळा फवारणी 
जळगाव शहरात सद्यःस्थितीत डेंगी, मलेरिया यासह साथीचे रुग्ण आढळून येत आहेत. आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये, तसेच शहरवासीयांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी डेंगी, मलेरिया व इतर आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी शहरात फॉगिंग, स्प्रेइंगसह तत्सम कार्यवाही करणे गरजेचे व शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे झालेले आहे. 

मनाई आदेश जारी करावा 
जळगाव शहरातील कोरोना रुग्णांची गेल्या काही दिवसांतील संख्या लक्षात घेता, रुग्ण दररोज वाढत आहेत. बाजारात किंवा चौकाचौकांत नागरिक विनामास्क घोळका करीत आहेत. लग्नसमारंभ, सभा, बैठकी किंवा इतर काही कार्यक्रमात कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांनी मास्क लावावा, शारीरिक अंतराचे पालन करावे, गर्दी होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी, अशी विनंती महापौर भारती सोनवणे यांनी केली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.