JN.1 Covid
JN.1 Covidesakal

Jalgaon Corona Update: जिल्ह्यात ‘जेएन १’चा भुसावळ, जळगावला रुग्ण; दोघांनाही सौम्य लक्षणे

कोरोनाच्या प्रकारातील ‘जेएन १’ या नव्या उपप्रकाराचे रुग्ण राज्यात आढळत आहेत.
Published on

Jalgaon Corona Update : कोरोनाच्या प्रकारातील ‘जेएन १’ या नव्या उपप्रकाराचे रुग्ण राज्यात आढळत आहेत. भुसावळ व जळगावमध्येही एक-एक रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. दोघांनाही सौम्य लक्षणे आहेत. पैकी जळगावातील रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असून भुसावळमधील रुग्णास गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता नाका, तोंडाला मास्क लावावा, वारंवार हात धुवावेत, सोशल डिस्टनसिंग पाळावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. (Corona Update Patient from Bhusawal, Jalgaon of JN 1 in district jalgaon news)

भुसावळला रुग्ण

कोरोनाच्या प्रकारातील ‘जेएन १’ या नव्या उपप्रकारातील भुसावळमध्ये एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळला आहे. त्यावर उपचार करून घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तो अयोध्या येथे गेला होता. तेथून आल्यानंतर त्याला न्युमोनिया होवून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली असता तो पॉझिटीव्ह आढळून आला आहे. त्याला गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

दुसरा रुग्ण जळगावात

दुसरा रूग्ण जळगावमध्ये एका खासगी रुग्णालयात आढळला आहे.त्याची रॅपिड अँटीजेन टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिलहा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. रोज किती रॅपिड अँटीजेन टेस्ट होतात याबाबत विचारणा केली असता, श्‍वास घेण्याचा त्रास होत असल्याबाबतचे रुग्ण सध्या तरी जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येत नाही. आले तर त्याची नक्कीच तपासणी हेावून उपचार होतील.

JN.1 Covid
Corona JN.1 Virus: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे आवाजही जाण्याची शक्यता, नवीन संशोधनात धक्कादायक खुलासा

कोरोनाने डॉक्टरच्या मृत्युची चर्चा

पिंप्राळातील एक डॉक्टर कोरोनाने मृत्यू झाल्याची अफवा पसरली आहे. या डॉक्टरला न्युमोनिया झाला होता. नंतर कोरोना होऊन मृत्यू झाला, अशी चर्चा नागरिकांत आहे. याबाबत जिल्हाधिकारी प्रसाद यांना विचारले असता, त्यांनी कोरोना होवून डॉक्टर मृत झालेला नाही. त्याचे कोरोना रिपोर्ट आपल्याकडे नाहीत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

आरोग्य यंत्रणा सज्ज : डॉ. ठाकूर

कोरोनोच्या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सज्ज आहे. पूर्ण रुग्णालयात ४५० बेडसाठी ऑक्सिजनचा पुरवठा होईल, अशी व्यवस्था आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनाची लक्षणे दिसताच, जिल्हा रुग्णालयात दाखल व्हावे, मास्क लावावा, जास्त गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले आहे.

JN.1 Covid
Covid JN1 : 'जेएन- १’ला घाबरू नका, सतर्क रहा' - आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.