जळगाव : कोरोना व्हेरिएंट बदलला; उपचारही बदलले

रेमडेसिव्हिरचा वापर मर्यादित; मॉलनुपिरावीर ठरेल उपयोगी
Omicron variant
Omicron variantSakal media
Updated on

जळगाव : कोरोनाचा बदललेला व्हेरिएंट(omicron varient in india) भारतात, राज्यात व पर्यायाने जळगाव जिल्ह्यातही तिसरी लाट(corona third wave in jalgaon) घेऊन आलाय. या बदललेल्या व्हेरिएंटने बाधित रुग्णांमधील लक्षणेही बदलली असून, त्यावरील उपचार पद्धतीही बदलत आहे. आता सरसकट रेमडेसिव्हिरचा(Remdesivir) वापर मर्यादित होणार असून, नव्यानेच बाजारात आलेल्या मॉलनुपिरावीर औषध कोरोनावर उपयोगी ठरेल, असा दावा केला जात आहे.

Omicron variant
वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेप

भारतात मार्च २०२० पासून कोरोनाची पहिली लाट सुरू झाली. आजार नवखा असल्याने उपचाराची पद्धती, दिशानिर्देश उपलब्ध नव्हते. त्यामुळे पहिली लाट थोपवताना चांगलीच दमछाक झाली. दुसरी लाट व्हेरिएंट बदलल्याने आणखी तीव्रतेने आली. दुसऱ्या लाटेच्या वेळेपर्यंत कोरोनावर औषध नव्हते, तरी उपचाराची दिशा बऱ्यापैकी माहीत झाली, तरीही दुसऱ्या लाटेत जीवितहानी अधिक झाली. कारण, या लाटेत ऑक्सिजन व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिरसाठी संघर्ष करावा लागला. आता तिसरी लाटबदललेले वर्ष कोरोनाची तिसरी लाट घेऊनच आले. देशात व राज्यातील महानगरांमध्ये ही लाट वर्षाच्या शेवटीच सुरू झाली होती. गावपातळीपर्यंत ती जानेवारीच्या पहिल्या तारखेपासून सुरू झाली आणि पुन्हा एकदा निर्बंधांची वेळ येऊन ठेपली.

Omicron variant
साताऱ्यात विद्यार्थ्यांचा पुलावरुन जीवघेणा प्रवास; पाहा व्हिडिओ

लक्षणे, उपचारही बदलले

तिसरी लाट सामान्यपणे ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णांमध्ये जी लक्षणे होती ती ओमिक्रॉन बाधित रुग्णांमध्ये नाहीत. किंबहुना दोन्ही लाटांपेक्षा यावेळच्या रुग्णांमधील लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे आधीचा अनुभव आणि त्यावरील आदर्श उपचार पद्धती व जोडीला आणखी काही औषधेही हाती असल्याने या वेळी उपचारही बदलल्याचे दिसत आहे. कोरोनासंबंधी उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर्स सध्या बाधित आढळून येत असलेल्या सौम्य लक्षणांच्या रुग्णांसाठी नवी औषध देत आहेत.

Omicron variant
सातारा : ‘आरटीई’ कागदावर, पोरं मोलमजुरीवर..!

‘मॉलनुपिरावीर’चा समावेश

पहिल्या लाटेमुळे धास्तावलेल्या नागरिकांना गेल्या वर्षी जानेवारीत आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीने दिलासा दिला. परंतु, लशींच्या मर्यादित साठ्यामुळे लसीकरण वेगाने होऊ शकत नव्हते. त्यातच दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवून दिला. मात्र, सरत्या वर्षअखेरपर्यंत तीन- चार लस व त्यांचे कोट्यवधी डोसेज नागरिकांपर्यंत पोचले. दोन वर्षांतील संशोधनाने कोविडवरील औषधीनिर्मितीचे आव्हानही पेलले आणि गेल्या वर्षीच्या अखेरपर्यंत रेड्डीज लॅबोरेटरीजचे मॉलनुपिरावीर ड्रगही बाजारात आले. आता सध्याच्या बाधितांना मॉलनुपिरावीर दिले जात आहे. फेवीपिरावीरची जागा या औषधाने घेतली असून, या कॅप्सुल्स प्रभावी असल्याचा दावा केला जात आहे.

सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना सध्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मॉलनुपिरावीरच्या गोळ्या दिल्या जात आहेत. हे औषध जळगावच्या बाजारपेठेत उपलब्ध असून, कोरोनाबाधितांनी ती परस्पर न घेता तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच घ्यावी. मेडिकल दुकानदारांनीही प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध देऊ नये.

-सुनील भंगाळे, जिल्हाध्यक्ष, केमिस्ट संघटना

तिसऱ्या लाटेच्या तोंडावर केंद्र व राज्य शासनाने उपचार पद्धतीबाबत नव्याने दिशानिर्देश दिले आहेत. त्यानुसार सौम्य, मध्यम स्वरूपाचे लक्षणे असलेल्या रुग्णांवर व गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी नियोजन करण्यात आले आहे.

-डॉ. जयप्रकाश रामानंद,

अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()