Jalgaon News : 75 कोटींचा मक्ता, तरी रस्त्यावर कचरा कसा? महासभेत प्रशासनावर हल्ला

Mayor Jayashree Mahajan speaking at the General Assembly held in the Municipal Corporation on Friday. Neighbor Deputy Mayor Kulbhushan Patil, Commissioner Dr. Vidya Gaikwad etc.
Mayor Jayashree Mahajan speaking at the General Assembly held in the Municipal Corporation on Friday. Neighbor Deputy Mayor Kulbhushan Patil, Commissioner Dr. Vidya Gaikwad etc.esakal
Updated on

Jalgaon News : शहरातील रस्त्यांवरील कचरा उचलण्यासाठी तब्बल ७५ कोटी रुपयांचा मक्ता ‘वॉटरग्रेस’ कंपनीला दिला आहे. तरीही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा दिसत आहे.

त्याबाबत नियोजन का केले जात नाही, असा प्रश्‍न उपस्थित करून नगरसेवकांनी महापालिका प्रशासनास चांगलेच धारेवर धरले. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक डॉ. अश्‍विन सोनवणे यांनी शहर कचरामुक्त न झाल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा दिला. (corporators held municipal administration in good stead jalgaon news)

नगरसेवक डॉ. सोनवणे यांनी सभा सुरू होताच शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न उपस्थित केला. डॉ. सोनवणे म्हणाले, की महापालिकेकडून वॉटरग्रेस कंपनीला कचरा शहरातील उचलण्यासाठी मक्ता दिला आहे. दररोज २२० टन कचरा जमा होत असल्याचे दाखविण्यात येत आहे. त्यासाठी तब्बल ७५ कोटी रुपये महापालिका अदा करीत आहे.

शहरातील ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले कसे दिसतात, असा प्रश्‍न डॉ. सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना विचारला, तसेच मक्तेदाराला ज्या अटी शर्तींनुसार मक्ता दिला, त्यांचे पालन होत नसताना किरकोळ दंड वगळता मक्तेदारावर ठोस कारवाई कशी होत नाही, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

नगरसेवक इबा पटेल, नितीन लढ्ढा, नवनाथ दारकुंडे, राजेंद्र घुगे, प्रशांत नाईक, विष्णू भंगाळे, नगरसेविका उज्वला बेंडाळे, सरिता नेरकर, रंजना वानखेडे, पार्वताबाई भिल, ॲड. शुचिता हाडा यांनीही साफसफाई होत नसल्याबाबत प्रश्‍न उपस्थित केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mayor Jayashree Mahajan speaking at the General Assembly held in the Municipal Corporation on Friday. Neighbor Deputy Mayor Kulbhushan Patil, Commissioner Dr. Vidya Gaikwad etc.
Jalgaon Anil Patil : ...अन् भूमिपुत्र झाले नतमस्तक

महापौरांचेही नाले सफाईचे आदेश

महापौर जयश्री महाजन यांनी नाल्यांची साफसफाई व्यवस्थित झाली नसल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, की नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरत आहे. त्यामुळे नाल्यांचे सर्वेक्षण करून अतिक्रमण काढण्याचे आदेश त्यांनी दिले.

वॉटरग्रेसकडून नगरसेवकांना पाकिटे

सफाई मक्तेदार वॉटरग्रेस कंपनीकडून नगरसेवकांना पाकिटे दिले जात असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक इब्राहीम पटेल यांनी करताच मोठा गोंधळ झाला. श्री. पटेल म्हणाले, की मक्तेदाराकडून कचऱ्याऐवजी मुरूम व माती वाहनांमध्ये भरून कचऱ्याचे वजन वाढविले जाते.

Mayor Jayashree Mahajan speaking at the General Assembly held in the Municipal Corporation on Friday. Neighbor Deputy Mayor Kulbhushan Patil, Commissioner Dr. Vidya Gaikwad etc.
Jalgaon Anil Patil : नेत्यांनी माघार घेतली नसती, तर त्याचवेळी.... मंत्री अनिल पाटील यांचे वक्तव्य

नगरसेवकांना पाकिटे देऊन हा प्रकार दाबला जात आहे. नगरसेवकांनी पाकिटे घणे बंद करून मुरूम-माती भरलेली वाहने पकडणे सुरू केल्यास आपोआप मक्तेदार ठिकाणावर येईल. पाकिटे घेण्याच्या आरोपावर चार ते पाच नगरसेवकांनी आक्षेप घेतला.

एक महिन्यात कचरामुक्ती : उदय पाटील

नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरल्यानंतर महापालिकेचे आरोग्याधिकारी उदय पाटील म्हणाले, की माझ्याकडे कर्मचारी संख्या कमी आहे. तरीही आपण साफसफाई चांगली करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आपल्याला केवळ एक महिन्याचा कालावधी द्या, आपण शहर ‘कचरामुक्त’ करून दाखविणार आहोत.

Mayor Jayashree Mahajan speaking at the General Assembly held in the Municipal Corporation on Friday. Neighbor Deputy Mayor Kulbhushan Patil, Commissioner Dr. Vidya Gaikwad etc.
Jalgaon NMU Workshop : शेतीत ॲग्री रोबोट, ड्रोनचा वापर अत्यावश्‍यक; तज्ज्ञांचा सूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.