Cotton Crop Crisis : पाऊस लांबल्याने अमळनेर तालुक्यात लागवड केलेले ५ हजार ३८४ हेक्टरवरील कापूस पीक धोक्यात आले आहे.
त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. वाढत्या उष्म्यामुळे मुळात नाजूक असलेले हे पीक मुबलक पाण्याअभावी करपत आहे. लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी लागवड केली, मात्र पावसाने पाठ फिरविल्याने ते संकटात सापडले आहेत. (Cotton crop in danger due to prolonged rains jalgaon news)
अमळनेर तालुक्यात दरवर्षी प्रमाणे यंदा देखील कुपनलिका उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करुन शेतकऱ्यांनी जवळजवळ ५ हजार ३८४ हेक्टरवर कापूस लागवड केली आहे. परंतु दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने उन्हाच्या तिव्रतेमुळे कापूस कोवळी रोपे करपू लागली आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या तापमानाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे आहे. दर्जेदार उत्पादन मिळते. यामुळे उत्पादनाला चांगला भाव मिळतो. निश्चितच या उपक्रमाचा फायदा होईल का ? शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कापूस लागवडीचे .
दरवर्षी शेतकरी मान्सूनपूर्व कापूस मे अखेर व जून महिन्यात लागवड करत असतो.यावर्षी देखील शेतकऱ्यांनी कापसासाठी पाणी राखून ठेवत मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली आहे. परंतु मागील काही दिवसापासून तापमानात प्रचंड वाढ होत असल्याने लागवड केलेली कापसाच्याचे कोवळी रोपे जागीच जळु लागली आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. दरवर्षी शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत कापूस लागवडीकडे वळला आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न कापूस निघत असल्याने शेतकरी लखपती बनले आहे.
मागील वर्षी अतीपावसामुळे कापूस पिक खराब झाले होते. त्यामुळे कापूसान शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन होऊ शकले नाही. यंदा माञ मागील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी कापूस लागवडीचे जोरात नियोजन केले, परंतु वाढत्या तापमानामुळे रोपे सुकत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कूपनलिका पाण्याच्या भरवशावर कापसाची लागवड केली. त्यांच्या कूपनलिका केव्हाच तळ गाठला आहे. असताना कापूस जगविण्यासाठी शेतकऱ्यांना धरपड करत आहे. वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.