Jalgaon Unseasonal Rain Damage : अवकाळीमुळे कापसाचे उत्पादन केवळ 60 टक्के

cottan
cottansakal
Updated on

Jalgaon Unseasonal Rain Damage : जून ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे. जळगाव जिल्ह्यातील जवळपास आठ हजार ८३८ शेतकऱ्यांना पाच कोटी ९४ लाखांची आर्थिक मदत मिळणार आहे.

यासंदर्भात शासनाच्या महसूल व वन विभागाने शासननिर्णय काढला आहे. असे असले, तरी अवकाळीमुळे यंदा कपाशीचे केवळ ५५ ते ६० टक्के उत्पादन येण्याचा अंदाज आहे.(Cotton production is 60 percent due to unseasonal rain in district jalgaon news)

जळगाव जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाला असला तरी काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुराच्या घटनाही घडल्या. ज्या भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली होती त्या भागाचे पंचनामे करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता.

या नुकसानीमुळे जिल्ह्यातील केळी, कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यां‍च्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली. दरम्यान, राज्य शासनाकडे नुकसानभरपाईसाठी निधी मागणीचा प्रस्तावही पाठविण्यात आला होता.

शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा

जळगाव जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे तब्बल आठ हजार ८३८ शेतकरी बाधित झाले आहेत. या शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पाच हजार १४४ हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाले.

या नुकसानीपोटी राज्य शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे. यात जळगाव जिल्ह्यासाठी पाच कोटी ९४ लाखांची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही मदत तोकड्या स्वरूपाची असली तरी काहीअंशी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे.

cottan
Jalgaon Unseasonal Rain Damage : जळगावामध्ये अर्धातास वादळी पावसाचे ‘धुमशान’

वादळी पावसाने प्रचंड नुकसान

जळगाव जिल्ह्यात तीन दिवसांपासून वादळी पावसाने थैमान घातले आहे. या पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. अतिवृष्टी, पूरपरिस्थितीतून सावरत नाही तोच अवकाळी पावसाचा झटकाही शेतकऱ्यांना बसला आहे.

जिल्ह्यात पाचोरा, चाळीसगाव आणि जामनेर तालुक्यांतील एक हजार १२६ शेतकऱ्यांचे ५५२ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना या मदतीची शासनाकडून अपेक्षा आहे.

कापसाची वाताहात

पंधरा दिवसांत अवकाळीने कापसाचे मोठे नुकसान झाले. कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला. मजुरीचे गगनाला भिडलेले दर व कापसाच्या भावाला लागलेली घरघर यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याने शेतकरी सध्या मेटाकुटीस आला आहे. ‘नको ही शेती’ अशी म्हणण्याची पाळी त्याच्यावर आली आहे.

कापसाला सात हजारांचा दर

बेमोसमी पावसामुळे कापसाची पत सध्या अतिशय खराब झाली आहे. व्यापारी कापसाला सात हजारांचा दर देत आहेत. तीनशे ते साडेतीनशे रुपये देऊनही मजूर मिळत नाही. ही शेतकऱ्यांसाठी शोकांतिका आहे.

cottan
Jalgaon Unseasonal Rain Damage : ‘अवकाळी’चा फटक्यामुळे शेतकरी हवालदिल; तातडीने पंचनामे करा

कोरडवाहूचे हाल बेहाल

काही ठिकाणी कपाशीवर बुरशीजन्य रोग पडला आहे. अवकाळीच्या कोरडवाहू कापसाला बोंडे फुटू लागली होती. त्यामुळे उत्पादन अतिशय कमी येणार आहे. काही ठिकाणी पहिल्या वेचणीत नगण्य कापूस आला असून, दुसरी वेचणी बाकी असताना अवकाळीने फुटलेल्या कापसाची दाणादाण झाली आहे.

''यंदा कोरडवाहू शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जूनमध्ये झालेल्या उशिराच्या पावसाने व नंतर महिनाभराच्या दडीने कपाशीचे उत्पादन अतिशय कमी आले आहे. त्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे हाती येणारे संभाव्य कापसाचे उत्पादन काही किलोवर येणार आहे.''- किशोर पाटील, शेतकरी

''कापूस सध्या बाजारात येत नाही. कापसाची खरेदी-विक्री होत नसल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कपाशीच्या खंडीला ५५ ते ५६ हजारांचा दर मिळत आहे. दराबाबत अजूनही स्पष्टता नाही. यामुळे दर कितीपर्यंत वाढतील, याबाबत सांगता येणार नाही.''- प्रदीप जैन, अध्यक्ष खानदेश जिनिंग प्रेसिंग मिल असोसिएशन

cottan
Jalgaon Unseasonal Rain Damage : जिल्ह्यात अवकाळीने 905 हेक्टरच नुकसान; हरभऱ्यासह कांद्याचा समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.