Jalgaon News : मे महिना म्हटला की खरिपाची लगबग सुरू होते. ती अपेक्षेप्रमाणे सुरू झाली आहे. शेतात नांगरटी सुरू झाली आहे.
यंदा खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र सात लाख ७० हजार ८७८ हेक्टर आहे. त्यातील पाच लाख ५० हजार हेक्टवर कपाशीचा पेरा होणार आहे.
कृषी विभागाने अद्याप बीटीचे बियाणे उपलब्ध करून न दिल्याने शेतकरी इतर राज्यांत जाऊन बियाणे मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. (Cotton will be shown on five and half lakh hectares farmer king is getting ready for Kharip Sowing about to begin Jalgaon News)
शेतकऱ्यांनी खरिपासाठी लागणारे बियाणे, खतांसाठी बँकांकडे कर्ज मागणी सुरू केली आहे. काही शेतकऱ्यांनी जुने कर्ज फेडून नवीन कर्ज घेण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, ज्यांना अजून शासनाकडून विविध पिकांच्या नुकसानीची भरपाई येणे बाकी आहे. त्यांची मात्र पंचायत झाली आहे. बँका जुने कर्ज फेडल्याशिवाय नवीन कर्ज देत नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक विंवचनेत सापडला आहे.
सोने मोडून बियाणे घेण्याकडे कल
अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सोने विकून खरिपाच्या तयारीवर भर दिला आहे. यंदा कापसाला अपेक्षित दर मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवला आहे. कापसाला चांगला दर मिळाला असता, तर शेतकऱ्यांना सोने विकण्याची, सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ आली नसती, असे चित्र आहे.
बियाणे १ जूननंतरच
नगदी पीक म्हणून कापसाकडे बघितले जाते. शेतकऱ्यांनी यंदाही कापसावरच भर दिला आहे. यामुळे बीटी बियाणे केव्हा उपलब्ध होतील, याची शेतकरी वाट पाहत आहेत. महाराष्ट्रात १ जूननंतरच बीटी बियाण्यांची विक्री करावे, असे आदेश आहेत. यामुळे काही शेतकरी मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक राज्यात जाऊन बीटी बियाणे उपलब्ध होते का, याबाबत चाचपणी करीत आहेत. बागायतदार शेतकरी मेमध्ये कापूस लावतात. मात्र, कोरडवाहू शेतकऱ्याला बियाण्याची वाट पाहावी लागत आहे.
२७ लाख पाकिटांची मागणी
जिल्ह्यात कापूस पेरण्यासाठी २७ लाख ५० हजार बीटी बियाण्यांच्या पाकिटांची मागणी कृषी विभागाने केली आहे. ती जिल्ह्यातील डिस्ट्रिब्यूटरकडे १ जूनच्या अगोदर पोचतील, असे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी सांगितले. मका बियाण्यांची १४ हजार ७७५ क्विंटल, सोयाबीनची १२ हजार क्विंटल, अशी एकूण ४४ हजार ४३२ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
१६ भरारी पथके
बोगस बियाणे रोखण्यासाठी १६ भरारी पथके नेमली आहेत. बोगस बियाणे विक्री, अतिसाठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अनधिकृतपणे बियाण्यांची विक्री होत असल्याचे आढळल्यास पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यंदाचे प्रस्तावित पेरणी क्षेत्र असे
पिके- पेरणी क्षेत्र (हेक्टर)
*कापूस- पाच लाख ५० हजार
*ज्वारी- १९ हजार ३००
*मका- ९८ हजार ५००
*इतर तृणधान्य- दोन हजार
*तूर- नऊ हजार ४००
*मूग- नऊ हजार
*उडीद- ११ हजार ५००
*भुईमूग- दोन हजार
*तीळ- एक हजार
*सूर्यफूल- ५००
*सोयाबीन- २० हजार
*एकूण खरीप- सात लाख ६३ हजार २००
"शेतकऱ्यांनी १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय खरिपाच्या पेरण्या करू नयेत. जूनमध्येच पेरण्या कराव्यात. पावसाचा अंदाज घेत संमिश्र पिके घ्यावीत."
-संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
"शेतकऱ्यांनी बियाणे घेताना खरेदीची पक्की पावती विक्रेत्यांकडून घ्यावी. भविष्यात काही बियाण्यांबाबत तक्रार असल्यास हेच बिल महत्त्वाचा पुरावा ठरते."
-वैभव शिंदे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.