Jalgaon Crime : अघोरी शक्तीची भिती घालून दाम्पत्याची 11 लाखात लूट

Jalgaon Crime
Jalgaon Crimeesakal
Updated on

जळगाव : तुमच्या वास्तूत (घरात) करणी-भूतबाधा व आत्मा असल्याने घरात वाद होत असल्याची भीती घालून बाधा दूर करण्याचे आश्वासन देत जळगावातील एका जोडप्याला भोंदूबाबाने तब्बल साडेअकरा लाखांत गंडवल्याची घटना उघडकीस आली आहे.

रामानंदनगर पोलिसात भोंदुबाबासह त्याच्या पत्नी विरोधात महाराष्ट्र नरबळी, जादूटोणा व इतर अमानुष, अघोरी प्रथा विरोधी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(couple robbed of 11 lakhs by fear of Aghori Shakti Jalgaon Crime news)

Jalgaon Crime
Jalgaon : वीजखांबावरून पडून तरुणाचा मृत्यू

मैत्रिणीने रचला सापळा

शहरातील भिकमचंद जैन नगरात नितीन पाटील, पत्नी पल्लवी व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. ग्राफिक्स डिझायनर म्हणून त्याचा व्यवसाय असून कोरोना काळात ते प्रचंड आर्थिक आणि मानसिक तणावात होते. त्यातून पती- पत्नीत भांडणे सुरू झाली होती. पल्लवी यांच्या कॉलेजची मैत्रीण मनोरमा ललित पाटील ऊर्फ मोहिनी, ऊर्फ महिमाने (रा.मेरा घर, सावखेडा शिवार) त्यांना येथे ‘माझ्या घरी ये... पती यावर काहीतरी उपाय करतील’ असे सांगितले. तिचा पती भोंदूबाबा ललित हिम्मतराव पाटील याच्या फ्लॅटवर गेल्यावर त्याने ‘नुकत्याच मृत झालेल्या दिराचा आत्मा तुझ्या अंगात घुसला आहे.

त्या आत्म्याचे घरावर प्रेम असल्याने त्याची शांती केल्याशिवाय बाधा दूर होणे अशक्य असून घरावर बाहेरची बाधा असल्याची बतावणी केली. घरगुती ओळखीचा फायदा घेत महिमाने पती ललित अघोरी पूजा करतो, त्याच्या अंगात अजमेरचा पीर येतो.. असे सांगत विश्वास संपादन करून आपल्या अघोरी शक्तींची भीती या दांपत्याच्या मनात रुजवली.

भोंदुगिरीचे भारत दर्शन

भारत-पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या कनौट माता मंदिर परिसरातील गुप्तधन हवन पूजा विधी करून मिळणार आहेत.. तसे आदेशबाबा दमदम नाथ, मकसूद भय्या, सदगुरू नाथ माऊली यांच्याकडून संकेत मिळाले आहेत. त्यासाठी कनौट, ओंकारेश्वर, उज्जैन, अजमेर येथे होम हवन, पूजा विधी करावा लागेल, असे पीडित दांपत्यास सांगण्यात आले. त्याद्वारे ललित व त्याच्या पत्नीने विविध ठिकाणी शांती पूजा, विधी होमहवनच्या नावे तब्बल ११ लाख ३२ हजार रु. ऑनलाइन पद्धतीने व रोख असे वारंवार उकळले.

Jalgaon Crime
Sonu Sood: 'सोनू असो किंवा टोनू', चुकीचं बोलला नेटकऱ्यांनी झापडला

दांपत्याने काढले कर्ज

पीडित कुटुंबाने नातेवाईक, बचत गट यातून कर्ज घेत ही रक्कम उभी केली. यादरम्यान कर्जही वाढत गेले. शेवटी हे प्रकरण पोलिसात गेले तेव्हा या बाबाने ‘अघोरी शक्तीद्वारे तुमच्या सात पिढ्यांचा नाश करेन.. पैसे परत मागू नका’ अशी धमकी दिली. अखेर वेबसाइटवरून या पीडित दांपत्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सातारा ऑफिसमध्ये संपर्क केला व पुढे हालचाली होऊन गुन्हा नोंदला गेला.

अंनिसचा प्रभावी उपचार

प्रकरण समजून घेतल्यानंतर अंनिसच्या बुवाबाजी संघर्ष समिती सदस्य नंदिनी जाधव(पुणे), मिलिंद देशमुख (पुणे), अण्णा कडलासकर (पालघर), निता सामंत (चाळीसगाव) यांच्यासह टीम सोमवारी (ता.३) जळगावी धडकली. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, शहर ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड, तालुक्याचे कुंभार, रामानंदचे विजय शिंदे यांच्याशी चर्चा केली. काल रात्री आठ वाजता पोलिसांना विनंती अर्ज दिला. अखेर रामानंद पोलिस ठाण्यात या भोंदू दांपत्याविरूद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अघोरी, अमानुष, अनिष्ट प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध करणाऱ्या कायद्याच्या कलम 3(२) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

Jalgaon Crime
Eknath Shinde Melava: CM शिंदेचा ठाकरेंच्या प्रत्येक मुद्यावर पलटवार; जाणून घ्या सविस्तर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()