जळगाव : शहरात हमाली करता-करता एकाने चक्क घरातच नोटा छापण्याचा कारखाना उघडला. युट्यूबवर (Youtube) व्हिडीओ बघून घरीच नकली नोटा छापून टाकल्या. (court ordered seven days police custody to hamal who printing fake cash by watching youtube video jalgaon crime news)
५० हजारांत दीड लाखाच्या नोटा देणाऱ्या महाठगाला गुरुवारी (ता. २) न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पोलिस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या पथकाने देविदास पुंडलिक आढाव (वय ३१, रा. कुसुंबा) याच्याकडे तीन लाखांच्या नोटांची मागणी केली. आढाव याने आणलेल्या बनावट नोटा पाहून त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून १००, २०० आणि ५०० च्या एक लाख ६८ हजार ९०० रुपयांच्या नकली नोटा व त्याच्या घरून प्रिंटर, रंग आणि नोटा छपाईचे कागद हस्तगत केले होते.
संशयित आढाव याला न्यायाधीश आर. वाय. खंडारे यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. अविनाश पाटिल यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.