Jalgaon News: भक्तीभावातून मंदिर रस्त्याची निर्मिती! मेहुणबारेत प्रथमच नव्या यंत्राचा वापर

A one kilometer road connecting the ancient temple is in progress.
A one kilometer road connecting the ancient temple is in progress.esakal
Updated on

Jalgaon News : चाळीसगाव येथील उद्योजक तथा माजी नगराध्यक्ष भोजराज पुन्शी हे भक्तीभावातून स्वखर्चाने धुळे- चाळीसगाव रस्त्यापासून गावातील प्राचीन मंदिराला जोडणारा एक किलोमीटरचा डांबरी रस्ता स्वखर्चाने करुन देत आहेत.

शनी महाराजांवर असलेल्या श्रद्धेपोटी ते हे काम करीत आहेत. खास रस्ता कामासाठी श्री. पुन्शी यांनी सुमारे ८० लाखांचे ‘गेडर’ यंत्र आणले असून त्याचा शुभारंभ त्यांनी या रस्त्याच्या कामापासून केला असून त्यांच्या या दातृत्वाचे परिसरातून कौतुक होत आहे. (Creation of temple road out of devotion Using new device for first time in Mehunbaret Jalgaon News )

कुठल्याही रस्त्याचे काम करायचे झाले तर त्यासाठी शासनाचा निधी खर्च केला जातो. येथील प्राचीन शनी मंदिराचा रस्ता मात्र याला अपवाद ठरले आहे. १८६३ मधील हे मंदिर ख्यातीप्राप्त करुन आहे.

एकाच शिलेमध्ये हनुमंतराय, श्री कालभैरवनाथ व शनिमहाराज असे तिन्ही देवतांच्या मूर्ती मंदिरात आहेत. या मंदिरात सतरा महिन्यांपासून दर शनिवारी सायंकाळी हरीपाठ व कीर्तन होत आहे. शिवाय सुमारे पंधराशे लोकांना अन्नदानही या ठिकाणी केले जाते.

मंदिरात जाण्यासाठीचा कच्चा रस्ता पक्का करण्यासाठी एकाही राजकीय पुढाऱ्याने प्रयत्न केले नाहीत. केवळ तात्पुरती दुरुस्ती करुन वेळ मारुन नेली जात होती. विशेषतः पावसाळ्यात मंदिरात येणाऱ्या भाविकांची खूपच गैरसोय होत होती.

चाळीसगावचे माजी नगराध्यक्ष तथा रस्त्यांची कामे करणारे ठेकेदार भोजराज पुन्शी हे या मंदिरात एक दिवस दर्शनासाठी आले असता, रस्त्याअभावी होणारी गैरसोय त्यांनी स्वतः अनुभवली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A one kilometer road connecting the ancient temple is in progress.
Monsoon Tourism: पर्यटकांची इगतपुरी, भंडारदऱ्यात गर्दी! रंधा फॉल, भावली धरणाचे आकर्षण

मंदिराची सर्व जबाबदारी सांभाळणारे सेवानिवृत्त नायब तहसीलदार अमरसिंग जाधव यांच्यासह उपस्थित शनीभक्तांशी चर्चा करताना श्री. पुन्शी यांनी हा रस्ता स्वतः करुन देण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांना अशी आश्‍वासने यापूर्वी अनेकांनी दिलेली होती.

त्यामुळे श्री. पुन्शी हे काम करतीलच अशी खात्री कोणाला वाटत नव्हती. मात्र, श्री. पुन्शी यांनी दिलेला शब्द खरा ठरवत कुठलाही गाजावाजा न करता, एक दिवस आपली आवश्‍यक ती यंत्रसामुग्री व कामगार उपलब्ध करुन देत, प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरवात केली.

विशेष म्हणजे, ते हा रस्ता चांगल्या दर्जाचा डांबरी करुन देत आहेत. या कामासाठी श्री. पुन्शी यांनी तब्बल ८० लाखांचे ‘गडर’ यंत्र आणले असून त्याचा शुभारंभ त्यांनी याच कामापासून केला. त्यांचे चिरंजीव राज पुन्शी यांनी हे स्वतः या कामावर लक्ष ठेवून आहेत.

"शनी महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरावर जाण्यास चांगला रस्ता नसल्याने होणारी अडचण मी स्वतः अनुभवली होती. येथील भाविकांनी देखील ही समस्या माझ्याकडे मांडल्यानंतर त्यांना हा रस्ता करून देण्याचा मी शब्द दिला होता. त्यानुसार, प्रत्यक्षात कामाला सुरवात करुन दिली आहे. आपण या माध्यमातून लोकांच्या कामी येत आहोत, याचे मनस्वी समाधान आहे."

- भोजराज पुन्शी, माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक, चाळीसगाव

A one kilometer road connecting the ancient temple is in progress.
Onion Export Duty Hike: कांद्याच्या दराला लागणार दृष्ट! 40 टक्के निर्यात शुल्कामुळे शेतकरी संतप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.