जळगाव : क्रेडाई महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी जळगाव येथील प्रथितयश बांधकाम व्यावसायिक अनिश शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगावसारख्या लहान शहरातील बांधकाम व्यावसायिकाची राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड होण्याची ही पहिलीच वेळ असून, जळगावसाठी अभिमानाची बाब आहे.
क्रेडाई महाराष्ट्राची २०२३-२५ या दोन वर्षांची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात ही नियुक्ती करण्यात आली. अनिश शहा ‘सुकृती’ या नावाने बांधकाम क्षेत्रात विख्यात अरिहंत डेव्हलपर्सचे संचालक आहेत. (Credai of Maharashtra Anish Shah Vice President First opportunity for Jalgaon city Jalgaon News)
गेल्या चार वर्षांपासून ते क्रेडाई महाराष्ट्राचे संयुक्त सचिव म्हणून कार्यरत होते. क्रेडाई जळगावचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. संघटनेत राज्य व राष्ट्रीय पातळीवरील सक्रिय सहभाग, तसेच उल्लेखनीय कामामुळे त्यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
क्रेडाई ही बांधकाम व्यावसायिकांची संघटना असून, राज्यात ६५ शहरांत ती सक्रिय आहे. बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न सरकारदरबारी मांडण्यासोबतच विविध सामाजिक कार्यातही क्रेडाईचे योगदान असते.
"बांधकाम व एकूणच रिअल इस्टेटच्या क्षेत्रात लहान शहरांच्या समस्या वेगळ्या आहेत. महाराष्ट्र स्तरावर काम करीत असताना, या समस्या व प्रश्न शासनदरबारी मांडून त्यावर समाधन शोधण्याचा प्रयत्न करू."
-अनिश शहा, बांधकाम व्यावसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.