सीरियल किलरचा गुन्हे शाखेने केला भांडाफोड

crime news
crime newsesakal
Updated on

जळगाव : अंगावरील दागिने, रोकडसाठी वयोवृद्ध महिलांची हत्या करुन चोऱ्या करणाऱ्या सीरियल किलर भामट्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुरुवारी (ता. २३) मराबाई कोळी या वृद्धेची हत्या करुन अंगावरील दागिने चोरणाऱ्या भामट्याच्या अटकेनंतर त्याने अशाच प्रकारे एकामागून एक तीन खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे या प्रकरणात आकस्मिक मृत्यूचे गुन्हे संबंधित पोलिस ठाण्यात दाखल असून संशयित मुकूंदा ऊर्फ बाळू बाबूलाल लोहार (वय ३०, रा.किनगाव) याने पूर्वीचे खून पचवून घेतल्यानेच तो एकामागून एक हत्या करत असल्याचे त्याने कबूल केले आहे.

किनगाव (ता. यावल) येथील रामरावनगरात मराबाई सखाराम कोळी (वय ७०) ही वृद्धा घरात एकटीच राहत असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने गुरुवारी तिच्या घरात घुसून काळ्या रुमालाने तिचा गळा आवळून अंगावरील दागिने रोकड घेऊन पळ काढला. भरदिवसा सकाळी ११ ते रात्री ८ पूर्वी झालेल्या या घटनेत भामट्याने मराबाईचा खून करण्याच्या उद्देशानेच ती मरेपर्यंत तिचा गळा रुमालाने दाबून धरला. कुटुंबीयांनी तिला उपचारार्थ दाखल केले. तेथून तिला तातडीने जळगाव हलवण्यात येऊन तिच्यावर तातडीचे उपचार सुरु असताना तब्बल सात दिवसांनी मराबाई यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चपलेने दाखवला मार्ग...

मराबाई कोळी हत्या प्रकरणात पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी मिळालेल्या चप्पलवरुन संशय बळावल्याने तपासाला सुरवात झाली. तांत्रिक पुराव्यावरून संशयित मुकुंदा ऊर्फ बाळू बाबूलाल लोहार याला २७ जून रोजी ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.

crime news
नांदगाव येथे सर्पदंशाने 11 वर्षीय बालिकेचा मृत्यू

पहिला खून पचवला...

पोलिस निरीक्षक बकाले यांच्या हस्ते ‘खातरपाणी’ होत असल्याने मुकुंदा पोपटासारखा गुन्ह्यांची जंत्री वाचू लागला. त्याने चक्क आणखी एका खुनाचीच कबुली दिली. गावातीलच वृध्द महिला द्वारकाबाई चैत्राम सुरवाडे (वय ७०, रा. चांभारवाडा) यादेखील घरी एकट्या असताना २८ फेब्रुवारी २०२१ रोजी संध्याकाळी वीजपुरवठा खंडित झाल्यावर घरात घुसून रुमालाने गळा आवळून तिचा खून केला. नंतर अंगावरील सोन्याचे दागिने व घरातील पेटीचे कुलूप तोडून त्यातील पेंशनचे पैसे चोरले मात्र, या प्रकरणाची फारशी वाच्यता झाली नाही.

दुसरा खुनाची कबुली..

गुन्हे शाखेच्या कन्फेक्शन युनिटमध्ये दोन खुणांची कबुली देणारा मुकूंदा अजून काही बोलतो का म्हणून, खातरपाणीचा तिसरा राऊंड सुरु होता. यावेळी मात्र, त्याने काही बोलावे अशी अपेक्षाच नसताना तो पुन्हा नव्या खुनाची घटना ओकला... त्याने रुखमाबाई कडू पाटील (वय ७०) यांची हत्या (१९ ऑक्टोबर २०२१) कशी व का केली याच्या माहिती दिली.

तीन हत्यांचा उलगडा करणारे पथक...

निरीक्षक किरणकुमार बकाले, सहाय्यक फौजदार वसत लिंगायत, युनूस शेख, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, सुनील दामोदरे अशांच्या पथकाने चपलेवरुन संशयिताचा शोध घेतला, खुनाची क्रूरता पाहता संशयित मुकूंदाच्या अटकेनंतर इतर गुन्ह्याचा छडा लावला असून दाखल नसलेल्या इतर गुन्ह्यांबाबत बारकाईने माहितींचे संकलन करुन या संशयितांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

crime news
कर्जबाजारी शेतकऱ्याची चोरवड येथे आत्महत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.