Jalgaon News : जिल्हा न्यायालयात कार्यरत महिला वकिलाकडून जामीन अर्ज दाखल करताना झालेल्या तांत्रिक चुकीमुळे न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला होता.
कोरोना काळात कागदपत्रे हाताळण्यास पुरेशी सावधगिरी बाळगताना लिखाणात झालेल्या या चुकीमुळे दाखल गुन्हा (एफआयआर स्क्वॅश) करण्यासाठी दाखल अर्जावर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठात कामकाज होऊन खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाचे आदेश रद्दबातल ठरवले आहेत. (crime registered on adv rani agarwal attack on police vehicles in Yawal taluka during Corona period allegations resolved jalgaon news)
या आदेशामुळे सलग चार वर्षे दाखल गुन्ह्याप्रकरणी संघर्ष करणाऱ्या ॲड. राणी अग्रवाल यांनी अखेर न्याय पदरात पाडून घेतला आहे. कोरोना काळात यावल तालुक्यात पोलिस वाहनांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी यावल पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
दाखल गुन्ह्याचे यावल न्यायालयात कामकाज सुरु असताना भुसावळ अतिरिक्त सत्र न्यायालयाचे संशयितांना सोडण्याचे कुठलेही आदेश नसताना तसे शपथपत्र दाखल करून न्यायालयाची दिशाभूल केली म्हणून ॲड. राणी अग्रवाल यांच्याविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
त्यानुसार गुन्ह्याची (गुरन-३३२/२०२०) नोंद झाली होती. दाखल गुन्हा रद्दबातल व्हावा, यासाठी ॲड. अग्रवाल यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठात याचिका दाखल केली होती.
दाखल याचिकेवर न्या. मंगेश पाटील, न्या. शैलेश ब्राम्हे यांच्या संयुक्त पीठासमक्ष कामकाज होऊन प्राप्त दस्तऐवज, पुराव्यांचे अवलोकन दोन्ही पक्षाचा प्रदीर्घ युक्तिवाद होऊन खंडपीठाने याचिकाकर्त्या ॲड. अग्रवाल यांचा शपथपत्र दाखल करताना कुठलाही मलिन हेतू नव्हता.
अनवधानाने झालेली शपथपत्रातील चूक तांत्रिक चूक असून या प्रकरणी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम-१९५ अन्वये पूर्व चौकशी होणे अपेक्षीत होते.
यामुळे खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश रद्दबातलचे आदेश दिले. यामुळे दाखल एफआयआर रद्द झाली आहे.
न्याय देवता सत्याच्या बाजूने
"कोरोना काळात कागदपत्रे हाताळताना खूप काळजी घेतली जात होती. घाईगडबडीत तेव्हा लिखाणात झालेल्या तांत्रिक चुकीमुळे मला त्रास सहन करावा लागला. मात्र, तुम्ही सत्याच्या बाजूने उभे राहिलात की न्यायदेवता साथ देतेच. माझा न्यायावरील विश्वास अधिक दृढ झाला."- ॲड. राणी अग्रवाल
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.