Crime Update : अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास सश्रम कारवास

Crime News
Crime Newsesakal
Updated on

जळगाव : शहरातील समतानगर परिसरातील बालिकेला फूस लावून पळवून नेत चक्क २२ महिने डांबून ठेवत अत्याचार करणाऱ्या नराधमाला जळगाव जिल्हा न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास आणि ७४ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. गोलू रामसिंग राठोड (वय २१, रा. धनवाडा, ता. खिडकिया, जि. हरदा, मध्य प्रदेश, ह.मु. समतानगर, जळगाव) असे आरोपीचे नाव आहे.

समतानगर परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना १६ डिसेंबर २०१९ ला घडली होती. पळवून नेल्यानंतर या पीडितेवर अमानवीय पद्धतीने मारहाण, टॉर्चर करून ठार करण्याची धमकी देत तब्बल २२ महिने जबरी अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.(Crime Update Harsh imprisonment for raping a minor Girl Jalgaon crime news)

Crime News
Jalgaon : अरूंद फरशांमुळे एरंडोल- येवला राज्यमार्ग बनला मृत्युचा सापळा

दाखल गुन्ह्यात पीडितेची सुटका करून संशयिताला अटक करून तपासाअंती दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात पाठविण्यात आले होते. विशेष पॉक्सो न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज होऊन ११ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात अल्पवयीन पीडिता आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्षी-पुराव्याअंती आरोपी गोलू रामसिंग राठोड याला दोषी ठरविण्यात आले. त्याला पॉक्सो, बलात्कार, अपहरणासह विविध कलमांन्वये २० वर्षे सश्रम कारावास आणि ७४ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. चारुलता बोरसे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. ॲड. शारदा सोनवणे व पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.

Crime News
Jalgaon : शिंदाड अन् कजगाव येथे 10 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.