भुरटेचोर घरात शिरले अन्‌ हाती लागले घबाड

दुबईस्थित बहिणीने ठेवलेल्या १५ लाखांचे दागिने लंपास
crime update Jalgaon burglars stolen cash and gold Jewellery
crime update Jalgaon burglars stolen cash and gold Jewellerysakal
Updated on

जळगाव : शहरातील शिवाजीनगर रेल्वेपुलास लागून असलेल्या नवीपेठ परिसरातील राजू गणेशप्रसाद अग्रवाल यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी अंदाजे पंधरा लाख रुपये किमतीचे ३० तोळे सोन्याचे दागिन्यांसह किरकोळ रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. दुबई येथे राहणाऱ्या बहिणीने भावाकडे ठेवलेल्या दागिन्यांचे घबाड हाती लागल्याने इतर साहित्य सोडून चोरट्यांनी पोबारा केला. शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने हा मार्ग अनेक दिवसांपासून बंद आहे. रेल्वरुळाला लागून असलेल्या नवीपेठ भागात राजू गणेशप्रसाद अग्रवाल (वय ६५) कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. श्री. अग्रवाल यांचे दोन्ही मुलं पुणे येथे नोकरीला असून, गुरुवार (ता. २४) पासून राजू अग्रवाल पत्नी सीमासह दोन्ही मुलांना भेटण्यासाठी पुण्याला गेले होते. गेली सहा दिवसांपासून घर बंद असल्याची रेकी करून चोरट्यांनी रेल्वेरुळाच्या बाजूने येऊन घराच्या खिडकीच्या काचा तोडून गज वाकवत आत प्रवेश केला. चोरट्यांनी स्वयंपाकघरापासून ते बेडरूमपर्यंत सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकत घरातील तीस तोळे वजनाचे दागिने चोरून पेाबारा केला. अग्रवाल दांपत्य बुधवारी (ता. ३०) सकाळी ६.१५ ला घरी पोचल्यावर त्यांनी मुख्य दाराचे कुलूप उघडून घरात प्रवेश केल्यानंतर सर्व साहित्य अस्ताव्यस्त आढळून आल्यावर चोरी झाल्याची खात्री झाल्याने तत्काळ त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांकडून पाहणी

राजू अग्रवाल यांनी पोलिस ठाणे गाठल्यानंतर निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, गुन्हे शोध पथकाचे तेजस मराठे, रतन गिते, उमेश भांडारकर यांनी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता, यांच्यासह ठसेतज्ज्ञ, श्वानपथकांसह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ गाठून पाहणी केली.

भुरट्या चोरांच्या हाती लागले घबाड

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम जवळपास दोन वर्षांपासून रेंगाळत आहे. परिणामी, हा सर्व परिसर दारुडे, गर्दुल्ले आणि रेल्वेतील गुन्हेगारांचा वावर असलेला परिसर झाला आहे. त्यात अग्रवाल यांचे बंद घराच्या खिडक्या रेल्वे लाइनच्या बाजूने असल्याने चोरट्यांनी खिडक्यांचे लोखंडी गज वाकवून आत प्रवेश केला. घरातील एलईडी टीव्ही व इतर साहित्य चोरून नेण्यासाठी गुंडाळूनही ठेवले. मात्र, घरझडतीत चक्क तीस तोळे सोन्याचे घबाड आणि रोकड लागल्याने गुंडाळून ठेवलेला टीव्ही तसाच सोडून चोरटे पसार झाले.

दुबईस्थित नणंदसह भावजयीचे दागिने

राजू अग्रवाल यांची बहीण सुरेखा नंदलाल भावसार शहरातील भिकमचंद जैननगरात वास्तव्यास असून, पतीसह दुबईला स्थायिक आहेत. दुबईला जाताना त्यांचे दागिने भावाच्या घरी ठेवून गेल्या. बेडरूममधील सुरक्षित कपाटात पत्नी सीमा आणि बहीण सुरेखा यांचे असे तीस तोळे सोनं चोरट्यांच्या हाती लागले.

...असा ऐवज लंपास

  • मंगळसूत्र - तीन तोळे (एक लाख ५० हजार)

  • नेकलेस - तीन तोळे (एक लाख ५० हजार)

  • कानातील टॉप्स, सहा नग - तीन तोळे (एक लाख ५० हजार)

  • एक पेंडल, एक अंगठी - चार ग्रॅम (२० हजार)

  • सोन्याचे तुकडे दीड तोळे - ७५ हजार

  • दोन अंगठ्या, तीन शिक्के - दोन तोळे (एक लाख)

  • पाच सोन्याच्या चैन - दोन लाख रुपये

  • सोन्याचा नेकलेस - साडेचार तोळे (दोन लाख २५ हजार)

  • कानातील जोड आणि सोन्याचा हार - दीड तोळे (७५ हजार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()