Jalgaon News : कोविड काळातील गुन्हे मागे घेणार? 77 प्रस्तावांवर चर्चा

Jalgaon News
Jalgaon Newsesakal
Updated on

अमळनेर : कोविड (Covid) काळातील दाखल गुन्हे (Crime) मागे घेण्याच्या शासन आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. (crimes of Covid era will be withdrawn amalner jalgaon news)

यात सुमारे ७७ प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली.कोविड काळात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर विविध कलमान्वये, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये, साथ रोग नियंत्रण कायदा प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यात अडचणी येत असल्याने शासनाने सप्टेंबर २०२२ मध्ये गुन्हे मागे घेण्यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून प्रस्ताव मागविण्याचे निर्देश दिले होते.

यात प्रामुख्याने सार्वजनिक मालमत्तेचे ५० हजारांच्या वर नुकसान नसेल तर नुकसान भरपाई करून असा गुन्हा मागे घेण्यात यावा, वरील प्रकारच्या कलमाप्रमाणे दाखल असलेले मात्र कोणत्याही सरकारी कर्मचारी अथवा फ्रंटलाइन कर्मचारीवर हल्ले नसतील तर असे गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. आजी, माजी आमदार, खासदार यांच्यावरच्या गुन्ह्याबाबत मात्र उच्च न्यायालयाची परवानगी लागणार आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

Jalgaon News
Jalgaon News : चाळीसगावचे ग्रामीण रुग्णालय सलाईनवर; वैद्यकीय अधिकाऱ्यांसह निम्मी पदे रिक्त

बैठकीत प्राथमिक स्वरूपावर चोपडा शहर २६, चोपडा ग्रामीण २२, मारवड १७ , अमळनेर १२ प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. दरम्यान अमळनेरात कोविड काळात २४१ गुन्हे दाखल झाले होते. पैकी न्यायालयाने ४६ गुन्हे स्वीकारले होते. उर्वरित गुन्ह्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीस चोपडा परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रावळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, तहसीलदार अनिल गावित, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस निरीक्षक के. के. पाटील, पोलिस निरीक्षक कावेरी गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक विनोद पाटील उपस्थित होते.

Jalgaon News
Jalgaon News : पारोळा मतदारसंघात 100 कोटींच्या कामांना मंजुरी; विकासकामांना येणार वेग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.