साडेसहा लाख गुन्हेगारांची ‘कुंडली’ एका क्लिकवर

‘डँबिस’ गुन्हेगारांची माहिती ‘अँबिस’ प्रणालीत जतन, जिल्‍हा पोलिसदलाचे ‘स्कॉटलंड यार्ड’ पोलिसांच्या पावलांवर पाऊल; जळगाव पोलिस दलाने मोडले देशातील सर्व पोलिसदलांचे रेकॉर्ड
While searching for information in a scientific manner through Ambis system SP Dr. Praveen Mundhe.
While searching for information in a scientific manner through Ambis system SP Dr. Praveen Mundhe.Sakal
Updated on

जळगाव - देशभरातील विविध राज्यांतील पोलिसांना जमले नाही ते जळगाव पोलिसदलाने साध्य आणि शक्य करून दाखवलेय. ‘स्कॉटलंड यार्ड’ पोलिसांच्या पावलांवर पाऊल ठेवत जळगाव पोलिसांनी विविध गुन्ह्यात अटक, रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारी प्रकारात मोडणाऱ्या तब्बल साडेसहा लाख आरोपींची डिजिटल कुंडली’च तयार केली आहे. जटिल गुन्हे उघडकीस आणण्यास ही माहिती भविष्यात प्रचंड उपयोगी पडणार आहे.

मिशन इंपॉसिबल, जेम्स बाँड यांसारख्या हॉलिवुड गुन्हेशोधक चित्रपटांमध्ये एखादा मोठा गुन्हा घडल्यावर पोलिस दलाची आधुनिक यंत्रणा जशी सज्ज होते, त्याच धर्तीवर जळगाव जिल्‍हा पोलिस दलाने आधुनिक यंत्रसामग्री सज्ज केलीय. गुन्हेगार आणि गुन्हेगारीचा इतिहास लिहून काढलाय, तोही अत्याधुनिक डिजिटल पद्धतीने.

३५ ठाण्यांचा डेटा

जिल्ह्यातील सर्व ३५ पोलिस ठाण्यात अटक झालेल्या तब्बल साडेसहा लाख गुन्हेगार, शिक्षापात्र आरोपी यांच्यासह गुन्ह्यातील गुन्हेगारांच्या हाता-पायाचे ठसे, अंगावरील व्रण, डोळ्यांची बुबुळे, चेहऱ्याची बनावट याची डिजिटल माहिती संकलित करून त्याचे जतन आणि संवर्धन करत आपला स्वतःचा नवा डेटा-बेस तयार केला आहे. भविष्यात घडणारे गुन्ह्यांची उकल आणि गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी या डेटाबेसचा मोलाचा सहभाग राहणार असून, अगदी एका क्लिकवर ही माहिती उपलब्ध होणार आहे. पोलिसदलातील अंगुली मुद्रण शाखेला अत्याधुनिकतेची जोड देत त्याअंतर्गत पोलिसदलाने हा इतिहास रचला.

काय आहे ‘अँबिस’ प्रणाली

‘ऑटोमेटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टम’ अर्थात (अँबिस) AMBIS असे या अत्याधुनिक प्रणालीचे नाव आहे. अँबिस संगणकीय प्रणालीत अटक आरोपींच्या बोटांची ठसे पत्रिका, तळहाताच्या पत्रिका, फोटो, डोळ्यांचे बुबुळे, चेहऱ्याची बनावट, शरीरावरील व्रण, खुणा आदी सर्व डिजिटल स्वरूपात संकलित करून त्याचे जतन केले आहे. कुठलाही गंभीर गुन्हा घडल्यावर घटनास्थळावरून प्राप्त पुरावे, ठसे आदींचे संकलन करून या यंत्रणेद्वारे ते एका क्लिकद्वारे मॅचिंग करता येणार आहेत.

जळगाव दल एकमेव

अशी प्रणाली राबवणारे महाराष्ट्र राज्य देशात पहिले राज्य आणि राज्य पोलिसदलात जळगाव पहिले असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी उद्‌घाटनप्रसंगी माहिती देताना सांगितले. संकलित डेटाबेसनुसार अँबिस प्रणाली पोलिस विभागात वापरण्यात येणाच्या इतर संगणकीय प्रणालीशी जोडले जाणार आहे. तसेच सर्व ठाण्याअंतर्गत यापूर्वी अटक केलेल्या सर्व आरोपींचे सर्व ठशांची ऑनलाइन नोंदणी करून त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा पूर्वइतिहास तपासण्यासाठी तसेच कारवाईसाठी याचा उपयोग होईल, असेही ते म्हणाले.

...यांची होती उपस्थिती

या प्रसंगी अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, निरीक्षक किरणकुमार बकाले, निरीक्षक विठ्ठल ससे, राखीव पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, सहाय्यक निरीक्षक वसंत कांबळे, उपनिरीक्षक सचिन डोंगरे यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()