जळगाव : सालारनगरातील मशिदीच्या मौलवीला धमकावल्याची (Threaten) तक्रार देण्यासाठी मौलवी रविवारी (ता. १) एमआयडीसी पोलिसांत आले होते. मात्र, ज्याची तक्रार करायची तोच पोलिस ठाण्यात दिसल्याने मौलवी तेथून निघून गेले. संबंधित संशयित सहा वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातील खुनाच्या गुन्ह्याचा (Murder case) संशयित आरोपी असून त्याला घेण्यासाठी आलेले मध्यप्रदेश पोलिस अचानक एमआयडीसी (MIDC) पोलिसांत पोचले अन् संशयिताची ओळख पटवून सोबत घेउन गेल्याचा गजब किस्सा सोमवारी (ता. २) पोलिस ठाण्यात घडला. दोन संशयित अद्याप फरार आहेत. (criminal who Threaten Maulvi caught in murder case Jalgaon Crime News)
सालारनगरातील एका मशिदीचे मौलवी रविवारी रात्री अकरा वाजता एकाने धमकावल्याची तक्रार देण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आले होते. मात्र, तो व्यक्तीच (निजाम खान मुल्तानी) याला पोलिस ठाण्यात पाहून मौलवी उगाच वाद नको म्हणून निघून गेले. पोलिसांनी निजाम खान मुल्तानी यास सकाळी येण्याचे सांगितले, तेवढ्यात मध्यप्रदेश पोलिसांचे तपासपथक त्याठिकाणी धडकले. त्यांनी निजाम खान मुल्तानीची ओळख पटवून त्यास अटक करून नेले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.