Diwali 2023 : दिवाळी अर्थात, ‘लक्ष्मीपूजन’ रविवारी (ता. १२) सर्वत्र मोठ्या उत्साहात, पारंपरिक पद्धतीने साजरा झाले. नागरिकांनी नवीन कपडे घालून एकमेकांना भेटून, फोनद्वारे, सोशल मीडियाद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
दुपारी साडेपाचपासून सुरू झालेले लक्ष्मीपूजन रात्री साडेनऊपर्यंत चालले. रात्री उशिरापर्यंत आतषबाजी करण्यात आली. (crowd at market on sunday for Diwali shopping in jalgaon news)
दिवाळीच्या खरेदीसाठी रविवारी बाजारपेठांमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. कपडे, सोने, नवीन वाहन खरेदीसह इतर वस्तूंच्या खरेदीतून कोट्यावधींची उलाढाल बाजारपेठेत झाली.
घराच्या अंगणाची शोभा वाढवणाऱ्या रांगोळीच्या व्यवसायातून लाखोंची उलाढाल झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. विविध रंगबेरंगी रांगोळी बाजारात उपलब्ध आहे. पांढऱ्या रांगोळीसह विविध रंगांतील रांगोळ्यांना पसंती होती.
दिवाळीला नवीन कपडे, तयार कपडे घातले जातात. शहरातील सेंट्रल फुले मार्केट, महात्मा गांधी मार्केट, गोधडीवाला मार्केटसह अनेक ठिकाणी कपड्याच्या शोरूमध्ये आज खरेदीसाठी गर्दी होती. नवीन रेडिमेड कपड्यांची ग्राहकांनी खरेदी केली.
कपडे विक्रीच्या दुकानांसह रस्त्यावर नवीन कपडे विकणारेही कमी दरात कपडे विकत होते. ग्राहकांची तेथेही गर्दी होती.
ऑफरचे फलक
व्यापाऱ्यांनी दिवाळीनिमित्त विविध वस्तूंवर विशेष ऑफरचे डिजिटल फलक लावले होती. रेडिमेड कपडे, ड्रेस मटेरिअलची दुकाने सजली होती. मुलींसाठी अक्षरा पॅटर्न, उत्तरण, मसक्कली वासह विविध मालिकेतील गाजणारे ड्रेस या नावाने प्रसिद्ध झालेल्या फॅन्सी
आकर्षक साड्यांची विक्री झाली. फॅन्सी साड्यांसह काठापदराच्या साड्या, पैठणी, सिल्क, नेट, सिमर, जार्जेंट, सिफॉम, टिश्यू, एम्ब्रॉयडरी वर्क, जरीवर्क, अॅन्टिवर्कच्या साड्यांना मागणी होती.
जिन्स, टी-शर्टला पसंती
बाजारात थ्री-फोर्थ, सावरिया, शॉर्ट मिडी, वेस्टर्न कार्गो, जिन्स, टी-शर्ट, पांढऱ्या रंगाचे शर्ट, मोदी कुर्ता, जॅकेट तरुणांचे आकर्षण ठरत आहेत. पाचशेपासून दोन हजार रुपयांपर्यंत विविध प्रकारात कपडे उपलब्ध आहेत.
मिठाईला मागणी
लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या मूर्ती, केरसुणी, पणती, तयार दिवे, झुंबर, तोरण, साळीच्या लाह्या, बत्तासे, उसाचे दोन ते पाच नग, विविध प्रकारची फळे, पेढे, बर्फी, मिठाई, तयार फराळाला आज प्रचंड मागणी होती. सकाळपासूनच नागरिकांची बाजारपेठेत गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटलेली असल्याने सर्वत्र तोबा गर्दी होती.
वाहनांच्या शोरूममध्ये गर्दी
दिवाळीला नवीन वाहने खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी आवडत्या रंगातील दुचाकी, चारचाकी वाहने आरक्षित करून ठेवली होती. रविवारी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर त्यांनी ते वाहने घरी नेले.
विविध वाहनांच्या शोरूमध्येही नागरिकांची सकाळपासूनच वाहने घेण्यासाठी कुटुंबीयांसह गर्दी होती. सुमारे पंधराशे दुचाकी, तर सातशे चारचाकी वाहनांची विक्री झाल्याची माहिती वाहन विक्रेत्यांनी दिली.
झेंडूचा दर १३० वर
लक्ष्मीपूजनाला झेंडूच्या फुलांनी वाहन, घर, कार्यालये सजविली जातात. यामुळे रविवारी झेंडूला मोठी मागणी होती. सकाळी पन्नास ते साठ रुपये असलेला झेंडू दुपारी १३० रुपये प्रतिकिलो दराने विकला गेला. लक्ष्मीपूजनासाठी कमळाच्या फुलाला विशेष महत्त्व असते. पांढऱ्या व लाल कमळाच्या एक फुलाची दहा ते वीस रुपयांना एक याप्रमाणे विक्री झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.