Ajanta Caves: जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पर्यटकांची तोबा गर्दी! अधिक मास, रविवारच्या सुट्टीचा आनंद

Crowd of tourists in Ajantha Caves area.
Crowd of tourists in Ajantha Caves area.esakal
Updated on

Ajanta Caves : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला रविवार व अधिक मासाचा शेवटचा दिवस असल्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

त्यात पावसाचे आगमन झाल्याने लेणीच्या सफारीसह पावासात भिजत लेणी पाहण्याचा मनमुराद आनंद पर्यटकांनी लुटला. (Crowd of tourists in Ajanta Caves adhik Mass joy of Sunday holiday jalgaon)

लेणीला आज दिवसभरात सुमारे आठ हजार पर्यटकांनी भेट दिली. देशविदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक पावसाळ्यात लेणी व लेणीतील धबधबा पाहण्यासाठी निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात.

त्यात रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अजिंठा लेणी फुल्ल झाली होती. बस आगारातील कर्मचाऱ्यांनी मात्र गर्दीमुळे धांदल उडाली. मागील रविवारी कमी बस असल्याने पर्यटकांना जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crowd of tourists in Ajantha Caves area.
Nashik News: आदिवासी शेतजमीन मिळाली मूळ मालकाला! बिरसा ब्रिगेड आदिवासी संघटनेचा पाठपुरावा

खबरदारी म्हणून सोयगाव आगाराच्या चौदा बस सुरू असूनही पर्यटकांना पावसात रांगा लावाव्या लागल्या. पर्यटकांना ताटकळत उभे राहावे लागले. बस आगाराला लेणीतील बस तिकिटावर ४ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे.

येणाऱ्या काही दिवसात पावसाळ्यात व सुट्टीच्या काळात पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पाहता आगाराच्यावतीने बस व चालक वाहकांची संख्या वाढविण्यात यावी, अशी पर्यटकांच्या वतीने मागणी करण्यात आली. अजिंठा लेणी परिसरासह टी पाइंटला जत्रेचे स्वरूप आले होते.

Crowd of tourists in Ajantha Caves area.
Majhi Mati Majha Desh Campaign: प्रत्येक गावातील कलश पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला पाठविणार!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.