Pitru Paksha: ग्रामीण भागातही कावळे दिसेनासे! पितृपक्षातच कावळ्यांचे स्मरण, पक्षीमित्रांची खंत

Pitru Paksha
Pitru Pakshaesakal
Updated on

Pitru Paksha : हिंदू संस्कृतीत एखाद्या व्यक्तीच्या मरणोत्तर पिंडाला शिवून मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी कावळ्यांचे मोठे योगदान आहे. परंतु पितृपक्षात पूर्वजांच्या आठवणी व त्यांच्या नैवेद्यासाठी तेवढ्यापुरतेच कावळ्यांचे स्मरण होत असल्यामुळे मानवी स्वार्थामुळे व बदलत्या वातावरणामुळे कावळ्यांच्या संख्येत घट होत आहे.

त्यामुळे पितृपक्षात कावळा मिळणे कठीण झाले आहे. सद्यस्थितीत पर्यावरणाच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम कावळ्यांवर झाला असून, कावळा आता ग्रामीण भागातही दिसेनासा झाला आहे.

पितृपक्षात नैवेद्य खाण्यासाठी कावळ्याची प्रतीक्षा करत अखेर पूर्वजांचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा लागत आहे. कावळ्यांची संख्या अशीच घटत राहिल्यास येणाऱ्या काळात पिंडदानाला शिवायला देखील कावळा मिळणार की नाही? असे म्हटले जात आहे. (Crows not seen even in rural areas remembrance of crows sorrow of bird friends only in Pitrupaksha jalgaon)

मध्यंतरीच्या काळात मोबाईल टॉवरमुळे चिमण्या नाहीशा होत असल्याची ओरड पर्यावरणप्रेमींकडून होत होती. मात्र बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत नव्या जगण्याची कला आत्मसात केल्याने आता चिमण्या परत दिसायला लागल्या आहेत. अशीच काहीशी परिस्थिती कावळ्यांच्या बाबतीत निर्माण झाली आहे.

वातावरणातील बदलत्या परिस्थिती जुळवून घेणारा एकमेव पक्षी म्हणून कावळ्याकडे पाहिले जाते. अंटार्टिका खंड वगळता जगभरात आढळणारा हा पक्षी असून, ३५ ते ४० वेगळ्या प्रजाती तर भारतात सहा प्रकारच्या प्रजाती कावळाच्या आढळतात.

उष्टे शिळे, खरकट्या अन्नावर सुद्धा हा बिनधास्त ताव मारून गुजराण करत असल्याने कावळ्याकडे पर्यावरणाचा सफाई कामगार म्हणून पाहिले जाते.

Pitru Paksha
Pitru Paksha 2023: पितृ पक्षात काय करावे आणि काय करू नये? सर्व महत्वाचे नियम जाणून घ्या

दरम्यान, पिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा व औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रमाणाबाहेर वाढवलेला हा वापर पक्षांच्या काही प्रजातींच्या मुळावर आलेला आहे.

त्या पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षी हे पिकांवरील कीड नियंत्रणासाठी मोठी भूमिका बजावत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले मित्र समजून पक्षी संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत, असे मत पक्षी निरीक्षकांनी व्यक्त केले आहे.

झाडांची फळे खाऊन त्यातील बिया आपल्या दृष्टीने ते इतरत्र पसरवितात. त्यामुळे एकप्रकारे अप्रत्यक्षपणे वृक्ष लागवडीचे कात कावळ्यांसारख्या पक्ष्यांकडून होत असते. त्यामुळे पक्षी हे पर्यावरणाचे रक्षक म्हणून काम करतात.

"सद्यस्थितीत कावळ्याचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. नैसर्गिक स्वच्छतादूत असणारे कावळे पर्यावरणाची साखळी चालविण्यासाठी अत्यावश्यक आहेत. भारतीय संस्कृतीत कावळ्याला खूप महत्त्व आहे. त्यांची दिवसेंदिवस कमी होणारी संख्या चिंताजनक आहे."- निंबा मराठे, पक्षीमित्र

Pitru Paksha
Pitru Paksha 2023 : पितृपक्षात कावळ्याला एवढं महत्व का? त्यामागे आहे महत्वाचं कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.