Jalgaon : मजूर नेणारी क्रूझर झाडावर आदळली; 1 ठार, 3 जखमी

jalgaon accident news
jalgaon accident newsesakal
Updated on

जळगाव : विदगाव-ममुराबाद रस्त्यावरून मजूर घेऊन येणाऱ्या भरधाव क्रूझर वाहनाने झाडाला जोरदार धडक दिली. अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून, इतर तीन प्रवासी मजूर गंभीर जखमी झाले. सुसाट वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे समोर आले. कांतिलाल हिरालाल पावरा (वय २६, रा. चांदसुरिया, पो. वासुडी, ता. शिरपूर, जि. धुळे) असे मृत मजुराचे नाव आहे. (Cruiser carrying labourers hits tree 1 killed 3 injured Jalgaon Latest News)

jalgaon accident news
Nashik Crime News : दोघे दुचाकी चोरटे जेरबंद; 4 लाखांच्या 9 दुचाकी जप्त

शिरपूर तालुक्यातील चांदसुरिया येथील जगदीश जंगलू पावरा याने जळगाव एमआयडीसी परिसरातील वेअरहाउस कंपनीत ट्रकमधील गहू व तांदळाची पोती उतरविण्याचा ठेका घेतला आहे. गावातील काही मजुरांना सोबत क्रूझरने घेऊन हमालीचे काम करतो. जगदीश पावरा क्रूझर गाडी चालवीत असल्याने दररोज मजुरांना ने-आण करावी लागत होती. सोमवारी (ता. १७) नेहमीप्रमाणे पहाटे साडेचारच्या सुमारास सर्व मजूर गाडीत बसून जळगावकडे रवाना झाले. क्रूझर वाहन जगदीश पावरा चालक चालवीत होता.

जळगावच्या दिशेने विदगाव-ममुराबाददरम्यान वाहनावरील चालक जगदीश पावरा याचा वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव वाहन थेट झाडावर आदळून बाजूच्या चारीत कोसळले. अपघातात कांतिलाल हिरालाल पावरा याचा जागीच मृत्यू झाला, तर रणजित ऊर्फ राजा जयसिंग पावरा (२४), गोकुळ वनासिंग भिल (३०), वांगऱ्या कालूसिंग पावरा (३०) असे तिघे मजूर गंभीर जखमी झाले. तिघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

jalgaon accident news
Nashik Crime News : विद्यार्थ्यांकडून खंडणी उकळणाऱ्या ‘भाई’ला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()