Jalgaon News : महाराष्ट्राचा अभिमान असणाऱ्या जळगाव केळीवर आले मोठे संकट ! अशी घ्या काळजी

माळकिन्ही (जि. यवतमाळ) - केळी पिकाची माहिती देताना शेतकरी लक्ष्मण मदने व इतर.
माळकिन्ही (जि. यवतमाळ) - केळी पिकाची माहिती देताना शेतकरी लक्ष्मण मदने व इतर.
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यात केळी हे प्रमुख पीक आहे. सुमारे ५५ ते ६० हजार हेक्टरवर केळीची लागवड केली जाते. कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) केळी पिकावर प्रमुख विषाणुजन्य रोग येण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी याबाबत वेळीच दक्षता घेतल्यास केळीपासून या व्हायरसला दूर ठेवता येईल, असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिला आहे. (Cucumber mosaic virus crisis on banana crop jalgaon news)

या व्हायरसची लक्षणे

सततचे ढगाळ वातावरण, जून-जुलैमध्ये होणारा अखंडित पाऊस, प्रकाशाची तीव्रता कमी असणे व किमान तापमान २५ अंश असणे, जास्त आर्द्र हवामान आदी घटक सीएमव्ही रोगास पोषक असतात.

सुरवातीस कोवळ्या पानांवर हरितद्रव्यविरहित पिवळसर पट्टे दिसणे, पानाचा पृष्ठभाग आकसला जाऊन व कडा वाकड्या होऊन पानांचा आकार लहान होणे, पानांच्या शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होणे, पानांच्या शिरांमधील भाग काळपट पडून पाने फाटणे, पोंग्याजवळील पाने पिवळी पडून पोंगा सडणे, झाडांची वाढ खुंटणे आदी लक्षणे सीएमव्ही रोगाची आहेत.

सीएमव्ही विषाणूचा प्राथमिक प्रादुर्भाव रोगट कांद्यापासून होतो. रोगाचा दुय्यम प्रसार प्रामुख्याने मावा किडींच्या माध्यमातून होतो. सीएमव्ही विषाणूची जवळजवळ एक हजार यजमान पिके आहेत. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी कोणतेही ठोस उपाय करता येत नाहीत. मात्र रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या उपाययोजना करावेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

माळकिन्ही (जि. यवतमाळ) - केळी पिकाची माहिती देताना शेतकरी लक्ष्मण मदने व इतर.
Agriculture News : 'यामुळे' शेळी गट वाटप योजनेचा निधी जाणार परत; अनेक गटांचे लाभार्थी वंचित

उपाययोजना अशा

प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळासकट उपटून दूर ठिकाणी जाळावीत. बागेचे दोन-तीनवेळा चार ते पाच दिवसांनी नियमित निरीक्षण करून रोगग्रस्त झाडे आढळल्यास त्यांची विल्हेवाट लावावी. बागेतील तसेच बांधावरील मोठा केणा, छोटा केणा, धोतरा, काहे रिंगणी चिलघोल, शेंदाड, गाजरगवत आदी प्रकारची तणे काढून बाग स्वच्छ ठेवावी. पिकांची फेरपालट करावी. केळी बागेभोवती रान कारली, शेंदळी, कटुंर्ले, गुळवेल यांसारख्या रानटी झाडांचे वेल नष्ट करावेत.

हे द्रावण फवारा

मावा या वाहक किडीच्या बंदोबस्तासाठी डायमेथोएट ३० ई. सी. २० मिली किंवा थायोमिथोक्झाम २५ डब्ल्यू.जी. २ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड १७.८ एसएल ५ मिली ही कीटकनाशके दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

माळकिन्ही (जि. यवतमाळ) - केळी पिकाची माहिती देताना शेतकरी लक्ष्मण मदने व इतर.
Jalgaon Market Committee : जळगाव बाजार समिती सभापतिपदी कुणाची बाजी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()