Agriculture News : पांढऱ्या सोन्याची परवड थांबेना; बळीराजापुढे दुहेरी संकट

Cotton
Cotton esakal
Updated on

मेहुणबारे (जि. जळगाव) : कापसाचे भाव कमी असल्याने शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला आहे. यामुळे आर्थिक उलाढाल ठप्प झाली असून, त्याचा परिणाम बाजारपेठेतील व्यवहारावर देखील होत आहे.

आर्थिक व्यवहार मंदावले असून, ग्रामीण भागात शेतकरी उधार उसनवार करून किंवा पाच पंचवीस किलो कापूस कवडीमोल भावात विकून उदारनिर्वाह करीत आहेत. (curbing inflation theft crisis to cotton farmers Itchy limbs by keeping cotton in house jalgaon news)

कापूस घरात ठेवल्याने अंग खाजविण्याचे विकार वाढत असून, दुसरीकडे शेतातील कापूस चोरीच्या घटनांमध्येही कमालीची वाढ झाली आहे.

अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाला यंदा अपेक्षित दर मिळणे दुरापास्त असल्याचे दिसून येत असून, कापसाच्या दराबाबत होत असलेली परवड पाहता शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

चाळीसगाव तालुका हा बहुताश शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शहरासह मोठ्या गावांमधील बाजारपेठ शेतीवरच अवलंबून असते. शेतकऱ्यांकडे पैसा आला तर बाजारपेठेत उलाढाल वाढते तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस पिकवला जातो.

९० हजार हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ५ हजार हेक्टरवर क्षेत्रावर कापसाची लागवड होते. पांढरे सोने म्हणून कापसाची ओळख आहे. गतवर्षी कापसाने दरात विक्रमी उच्चांक गाठला. कापूस हंगामाच्या शेवटी तर हा दर १२ ते १३ हजार रूपये क्विंटलपर्यंत पोहचला होता.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Cotton
Jalgaon Crime News : नशिराबादला गोवंश कत्तल प्रकरणी दोघे अटकेत

त्यामुळे अवकाळी पाऊस वा अतिवृष्टी होऊनही दर चांगला असल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा आला होता. यंदाही चांगला दर मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली. सुरूवातीला कापसाचा दर बऱ्यापैकी होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्याही अपेक्षा उंचावल्या होत्या.

साधारणत: दिवाळीनंतर कापसाच्या भावात तेजी येते. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कापसाच्या खरेदीला खऱ्या अर्थाने वेग येतो. गावागावांत कापूस व्यापारी खेडा पद्धतीने कापूस खरेदी करतात. मात्र यंदा जानेवारी संपण्याच्या मार्गावर असला तरी कापसाची उलाढाल ठप्पच असून, तुरळक कापसाची खरेदी-विक्री सुरू आहे.

गेल्या तीन, चार महिन्यांपासून कापसाच्या भावात सतत चढ-उतार होत आहेत. कापसाला किमान दहा हजार रूपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, अशी अपेक्षा आहे. तसा भाव मिळाला तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. मात्र सद्यस्थितीत आठ हजार दोनशे रूपयांच्या पुढे भाव जाण्यास तयार नाही.

सध्याचा कापूस दर शासनाच्या हमी भावापेक्षा थोडा अधिक असला तरी वाढती महागाई, महागडे बियाणे-खते, औषध फवारणीापासून ते वेचणीपर्यंतचा खर्च पाहता सात-आठ हजार रूपये भाव कापसाला परवडत नाही. त्यामुळे सरकारने कॉटन लॉबीचे हित न पाहता शेतकऱ्यांचे हीत साधावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cotton
Jalgaon Crime News : भरचौकात ड्रायफ्रूट व्यापाऱ्याला लुटले; भामटे भुसावळच्या दिशेने फरार

कापूस चोरीचे सत्र थांबेना

ग्रामीण भागात सध्या अद्यापही कापूस शेतकऱ्यांनी घरातच ठेवल्याने शेतकऱ्यांच्या खिशात पैसा नाही, अशी स्थिती आहे. परिणामी, बाजारपेठेतील खरेदी विक्रीवर त्याचा परिणाम जाणवत आहे. आर्थिक व्यवहार मंदावल्याने याचा व्यापाऱ्यांना देखील फटका बसला असून, बियाणे-खते विकी करणाऱ्या दुकानदारांच्या उधाऱ्या देखील ठप्प आहेत.

एकूणच कापूस दरवाढीच्या प्रतीक्षेने शेतकऱ्यांसह बाजारपेठांतील आर्थिक गणित पुरते कोलमडले आहे. दुसरीकडे कापूस चोरीचे प्रकार वाढले आहेत. नगरदेवळा येथे नुकताच दोन शेतकऱ्यांचा २८ क्विंटल कापूस शेतातील गोदामातून चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. एकापाठोपाठ एक अशा घटना सुरू असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

घरांत कापूस; अंग खाजण्याचे विकार

कापूस वेचणीचा हंगाम आता संपल्यात जमा असला तरी अपेक्षित भाव नसल्याने ९० टक्क्याहून अधिक कापूस अद्यापही शेतकऱ्यांच्या घरातच गेल्या दोन महिन्यांपासून पडून आहे. मात्र यामुळे कापूस असणाऱ्या घराघरात अंग खाजण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

घरात ढिगारा करून ठेवलेल्या कापसात पिसे तयार झाल्याने ही अंगखाजणीचा प्रकार ग्रामीण भागात घराघरांत दिसून येत आहे. त्यामुळे घरातील व्यक्ती कापसापासून लांब राहणे पसंत करत असले तरी ही अंग खाजण्याची लागण थांबता थांबत नसून शेतकरी तात्पुरता उपाय म्हणून अंग खाजविण्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या घेऊन तात्पुरता उपचार करून घेत आहेत.

Cotton
Jalgaon News : सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()