Jalgaon News : दहिगावात संचारबंदी; गावात तणावपूर्ण शांतता; दोन गटांतील वादाचे पडसाद

कुंभारवाड्यातून एका समुदायाची मिरवणूक जाताना फलक विटंबनेप्रकरणी बुधवारी (ता.७) रात्री दोन गटांमध्ये वाद झाला.
Police force deployed after curfew was imposed in Dahigaon village.
Police force deployed after curfew was imposed in Dahigaon village.esakal
Updated on

Jalgaon News : येथील कुंभारवाड्यातून एका समुदायाची मिरवणूक जाताना फलक विटंबनेप्रकरणी बुधवारी (ता.७) रात्री दोन गटांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दोन्ही गट लाठ्या-काठ्या घेऊन एकमेकांना भिडले. यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरापर्यंत पोलिस तळ ठोकून होते. या प्रकरणी अकरा संशयितांवर गुन्हा दाखल झाला.

त्याचे पडसाद गुरुवारी (ता.८) उमटले असून, सकाळी ‘गावबंद’सह टायर जाळपोळ व आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, प्रशासनाच्या आदेशानुसार गावात ४८ तासांची संचारबंदी लागू केली आहे. आता गावात तणावपूर्ण शांतता आहे. (curfew in Dahigaon tense silence in the village due to outcome of conflict between two groups jalgaon news)

गावात तणाव निर्माण झाल्यानंतर बुधवारी (ता.७) तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर रात्रभर कारवाईसत्र सुरू होते. या प्रकरणी परस्परविरोधी गटांनी तक्रारी दिल्या असून, रात्री उशिरापर्यंत त्यावर कारवाई सुरू होती. त्यात सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, गुरुवारी (ता.८) सकाळपासून गावातील सर्व व्यवसाय बंद करत गाव ‘बंद’ करण्यात आले. या वेळी टायरची जाळपोळ करून रस्ता बंद केला. बहुसंख्य महिला आणि युवकांचे दहिगावच्या पोलिस चौकीसमोर ठिय्या आंदोलन झाले. दुसऱ्या गटाकडून यावल पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, विभागीय पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंग सहकाऱ्यांसह ग्रामस्थांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी आल्या.

Police force deployed after curfew was imposed in Dahigaon village.
Jalgaon News : रेल्वे विभागातील 3 कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक’ संरक्षा पुरस्कार

मात्र, ग्रामस्थ ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी तहसीलदार व डीवायएसपी यांची वाहने अडविल्यामुळे सायंकाळी उपअधीक्षक अशोक नखाते यांनी दहिगावकडे धाव घेतली.

पोलिसांचे कारवाईसत्र सुरू

काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे सत्र सुरू केले. दरम्यान, उशिरापर्यंत यावल पोलिस, फैजपूरचे विभागीय अधिकारी, जळगावचे उपअधीक्षक अशोक नखाते व सहकारी तत्काळ हजर झाले. मात्र चिघळलेले वातावरण निवळायला तयार नव्हते. काही काळानंतर पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी लाठीचार्जही केला.

यात विशाल राजेंद्र चव्हाण आणि किरण पवार यांना जबर मार लागल्याने ग्रामस्थ जास्त आक्रमक झाले. कमांडो व पोलिस फौज दाखल असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे.

Police force deployed after curfew was imposed in Dahigaon village.
Jalgaon News : भुसावळकरांना विकास हवा, मग कर भरावाच लागेल : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.