Cyber Crime : महिला वकिलासह गृहिणीच्या खात्यात सायबर गुन्हेगारांचा डाका

Cyber Crime
Cyber Crimeesakal
Updated on

जळगाव : वीजबिल अपडेट करण्याच्या नावाखाली गजानन कॉलनीतील शांतीबन अपार्टमेंटमधील महिला वकिलास २० हजारांत ऑनलाईन गंडा घातला. दुसऱ्या एका घटनेत बँकेच्या क्रेडीट कार्डचा (Credit Card) ओटीपी (OTP) नंबर मिळवून वाघनगरातील गृहिणीस ५० हजार ७७४ रुपयांत गंडविण्यात आले.

शांतीबन अपार्टमेंटमधील ॲड. शिरीन अमरेलीवाला यांच्या मोबाईलवर तुमचे वीजबिल अपडेट नसून तुमची वीजकनेक्शन खंडित करण्यात येईल, असा मेसेज आला. त्या मेसेजमध्ये मोबाईल क्रमांक दिला होता. त्यावर तत्काळ कॉल केला. मात्र, त्यांचा कॉल कोणीही रिसीव्ह केला नाही. शुक्रवारी (ता. १८) सकाळी आठच्या सुमारास त्यांना पुन्हा फोन आला असता, अमरेलीवाला यांनी त्याला मी वीजबील भरले असून, तुम्ही मला परत का सांगत आहेत, अशी विचारणा केली. त्यावर समोरील व्यक्तीने नवीन नियमानुसार तुम्हाला तुमचे बिल अपडेट करावे लागेल, असे त्याने सांगितले.

Cyber Crime
Cyber crime : मोह, अज्ञान अन्‌ घाईच संकटात नेई

समोरील व्यक्ती सांगेल त्याप्रमाणे अमरेलीवाला यांनी मोबाईल ॲप लाऊनलोड केले. त्यात त्यांच्या बँकेची संपूर्ण माहिती भरायला लावली व दोनवेळा प्रत्येकी १० हजार रुपये, असे २० हजारांची रक्कम परस्पर वळती करून घेतली. फसवणूक झाल्याचे कळताच शिरीन अमरेलीवाला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

क्रेडीट कार्डचा नंबरद्वारे गृहिणीची फसवणूक

वाघनगरातील रहिवासी अश्विनी जयेश सावकारे (वय ३५) यांना मंगळावारी (ता. १५) अज्ञात महिलेने ८४४८४६९४१४ या क्रमांकावरून ॲक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. विश्वास संपादन करून क्रेडीट कार्डचा ओटीपी प्राप्त करून घेतला. नंतर सावकारे यांना त्यांच्या खात्यातून ५० हजार ७७४ रुपये ऑनलाईन परस्पर वळवल्याचे लक्षात आले. त्यांनी जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे तपास करीत आहेत.

Cyber Crime
Cyber Crime: सायबर क्राईमची तक्रार नोंदवा; तीही घरबसल्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.