जळगाव : पोस्टाने लकी ड्रॉ कूपन पाठवून त्यावरील क्रमांकावर संपर्क करण्यास सांगून लाखो रुपयांत गंडविले जात आहे. नवी पेठेतील गीता राजेश तिलकपुरे यांना स्विफ्ट कार लागल्याच्या कूपनाचे पत्र पाठवून नंतर विविध कर भरण्याच्या नावाखाली चार लाख ८० हजारांत गंडविले.
नापतोल ऑनलाइन शॉपिंग कंपनीकडून तुम्हाला मारुती स्विफ्ट डिझायर कार लकी ड्रॉमध्ये लागल्याचे कूपन गीता तिलकपुरे यांना पोस्टाने त्यांच्या पत्त्यावर आले. त्या कूपनवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे त्यात नमूद केले होते.
त्या क्रमांकावर सौ. तिलकपुरे यांनी संपर्क साधला असता, पलीकडून बोलणाऱ्याने आपले नाव नितीनकुमार सिंग सांगितले. (Cyber Criminals New Trick Housewife cheated for four lakh eighty thousand Lure of car by sending lucky draw coupons by post Jalgaon Crime News)
आपण नापतोल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून कथित नितीनकुमार सिंग याने सौ. तिलकपुरे यांना त्यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर कंपनीचे बनावट नाव, बोधचिन्ह, स्टॅंप असलेले मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचे खोटे पत्र, अशी एक ना अनेक कागदपत्रे पाठवून विश्वास संपादन केला.
आपल्याला कार मिळणार या आमिषाला भुलून सौ. तिलकपुरे यांनी विविध चार्जेसच्या नावाखाली फोन पेवरून नितीनकुमार सिंग याला वेळोवेळी चार लाख ८० हजार २४२ रुपये पाठविले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे तपास करीत आहेत.
गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून
सायबर भामट्यांचा नवा फंडा
यापूर्वी कुठल्या तरी बँकेचा मॅनेजर बोलतोय, तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक होणार आहे, सरकारी नोकरी लागली, विदेशात नोकरीची संधी यांसह विविध आमिष भ्रमणध्वनीवरून दिली जात होती. कुठली तरी लिंक पाठवून त्याद्वारे बँक खात्यातून लाखो रुपये लुटण्यात येत होते. आता या आमिषांना फारसे कुणी बळी पडत नसल्याने कुठल्या तरी कंपनीची एजन्सी मिळविण्याच्या नावे, फ्रन्चायजीसाठी डिपॉझिट म्हणून पैसे उकळले जातात.
आता तर चक्क सरकारी पोस्टातून पत्र पाठवून आमिष देऊन संपर्क करण्याचे सांगितले जाते. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या नावे खोटे सही-शिक्क्याचे पत्र असल्याने सामान्य नागरिकांचा विश्वास बसतो आणि त्यांची लाखो रुपयांची फसवणूक होते. नागरिकांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता खात्री करूनच पैशांचे व्यवहार करावेत, असे आवाहन जिल्हा पोलिस दलाने केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.