Jalgaon News : केळीचे साडेबाराशे हेक्टर क्षेत्रावर नुकसान; तालुक्यात चक्रीवादळाचा तडाखा

Rain News
Rain Newsesakal
Updated on

Jalgaon News : तालुक्यात गुरुवारी (ता.८) रात्री झालेल्या चक्रीवादळामुळे २७ गाव शिवारातील दीड हजार शेतकऱ्यांच्या साडेबाराशे हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

तसेच घरांची पडझड, वीज खांब वाकून तारा तुटून सुमारे ३५ लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, खासदार रक्षा खडसे व अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी केली. (Cyclone hits Raver taluka Houses collapsed power poles bent 27 villages affected Loss of banana on an area of ​​twelve and a half hundred hectares Jalgaon News)

तालुक्यात गुरुवारी रात्री सुमारे सव्वा ते दीड तास जोरदार चक्रीवादळ झाले. मुसळधार पाऊस व वादळामुळे अनेक ठिकाणी केळीचे नुकसान झाले. झाडे उन्मळून पडल्यामुळे विजेचे खांब वाकले. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या.

यामुळे बुधवारपासून वीजपुरवठा खंडित झाला तर अनेक घरावरील पत्रे अक्षरशः पत्त्याप्रमाणे उडाली. घरांची पडझड झाली. यामुळे तालुक्यातील नागरिकांचे शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे.

खासदार रक्षा खडसे, तहसीलदार बी. ए. कापसे, तालुका कृषी अधिकारी बी. सी. वाळके यांनी नुकसानीची पाहणी केली.

Rain News
Nashik News : राज्यातील आपत्तीग्रस्तांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांची वेतन कपात

केळीचे बाराशे हेक्टर क्षेत्रात नुकसान

रावेर तालुक्यात २७ गावातील १६५२ शेतकऱ्यांचे सुमारे १२५२ क्षेत्रातील केळी पीक जमीनदोस्त होऊन कोट्यवधींचे नुकसान झाले. गावनिहाय शेतकरी कंसात बाधीत क्षेत्र असे : यात उटखेडा ६५ (३२), भाटखेडा ६०(२८)., पिंप्रि ८८(७२), मंगरूळ १७२ (१४०), मोहगण ८२ (५५), अहिरवाडी १८५ (९८), निरूळ ८५ (६५), केऱ्हाळे बुद्रुक १३० (१०४), केऱ्हाळे खुर्द ९४ (६७), भोकरी ०७ (०९), जुनोने २८ (२२), पाडळे खुर्द ६८ (५२), पाडळे बुद्रुक ६७ (५८), खानापूर २० (१५), अभोडा बुद्रुक १५ (१२), अभोडा खुर्द ४०(५०), जिंसी ३५ (२५), विवरे बुद्रुक १० (०४), अजनाड १५ (१८), कुसुंबा बुद्रुक ७० (७२), कुसुंबा खुर्द १२० (१००), मुंजलवाडी ८० (९०), कर्जोद ०७ (०७), रावेर ११० (५०), पातोंडी ०२ (०२), पुनखेडा २(२), लालमाती ०५(०३).

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rain News
Nashik News : सावधान...पाल्ये पोहण्यासाठी तर गेली नाहीत ना!

दहा गावांतील २२७ घरांचे अंशतः नुकसान

रावेर तालुक्यात गुरुवारी झालेल्या चक्रीवादळामुळे घरावरील पत्रे अक्षरशः पत्याप्रमाणे उडाली. काही घरांवर झाडे पडून नुकसान झाले.

यात रावेर येथील सर्वाधिक १२०, रमजीपूर -२८, बक्षीपूर - ३१, शिंदखेडे - १५, खानापूर -१, पिंप्री १०, अहिरवाडी -१०, शिराळे खुर्द -५, जुनोने -२, कर्जोद - ५ असे एकूण २२७ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे तर अहिरवाडी येथे एक गाय व एक म्हैस दगावली आहे.

Rain News
Nashik Rain Update : जिल्ह्याच्या काही भागात आज हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

शहरात १२५ वीज खांबांचे नुकसान

रावेर शहरात गुरुवारी (ता. ८) सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे झाडे आणि फांद्या पडून १२५ विजेच्या खांबांचे ३५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे विभागीय अभियंता अनिल पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

त्यांनी सांगितले, की गुरुवारी रात्रीच १३२ के.व्ही. सबस्टेशनपासून १३ वीज उपकेंद्रांना होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम वीज महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले.

शुक्रवारी (ता. ९) पहाटेपासून पुन्हा सर्वच अधिकारी आणि कर्मचारी शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करीत आहेत. चार ट्रान्स्फॉर्मर्स बदलावे लागणार असून, कामाचा व्याप पाहता सर्वत्र वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी एखाद दुसरा दिवस लागू शकेल.

शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी आठपर्यंत शहरातील अधिकाधिक वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या कामी ग्रामीण भागातील वीज उपकेंद्रांचे अधिकारी आणि कर्मचारीही रावेरमध्ये येऊन सेवा देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Rain News
Jalgaon Crime News : घरखर्चाला पैसे देत नसल्याने पोटच्या मुलांनीच केला बापाचा खून

रावेर शहरात २४ तास वीजपुरवठा खंडित

दरम्यान, रावेर शहरातील अनेक भागात गुरुवारी सायंकाळी साडेसातपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. पंखे, कुलर आणि एअर कंडिशनर बंद असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

अनेकांचे मोबाईल चार्जिंग संपल्याने बंद झाले असून, ज्यांच्याकडे इन्व्हर्टर आहेत त्यांच्याकडे जाऊन मोबाईल चार्जिंग करण्याचे प्रकार झाले.

दिवसभर अनेकांनी एकमेकांना दूरध्वनीवर बोलून किंवा मेसेज करून वीजपुरवठा केव्हा सुरळीत होणार याबाबतची विचारणा केली. २४ तासापेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित होता. रात्री आठनंतर बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरळीत होईल.

Rain News
Nashik News : हौसला रखनेवाला, इमानदार सच्चा सैनिक हमने खोया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.